France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

Violent Student Protests : निदर्शनांदरम्यान काही ठिकाणी तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांशी संघर्षाच्या घटना घडल्याने आंदोलन हिंसक झाले. दोन दिवसांतील हिंसक निदर्शनांनंतर ४ हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
France Student Protests Turn Violent Over Education Reforms

France Student Protests Turn Violent Over Education Reforms

esakal

Updated on: 

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारती, शिक्षक-कर्मचाऱ्यांची कमतरता, खच्चून भरलेले वर्ग, सरकारी अर्थसंकल्पातील कपात आणि कठीण वेळापत्रक यांसारख्या मुद्द्यांवरून सुरू झालेल्या निदर्शनांदरम्यान अनेक शहरांमध्ये तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांशी संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांतील हिंसक निदर्शनांनंतर ४ हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com