165 कोटींची लॉटरी लागल्यावर निभावली मैत्री, 28 वर्षांपूर्वी दिलं होतं वचन

US lottery friend share
US lottery friend share

वॉशिंग्टन - लॉटरी लागल्यावर एका रात्रीत नशीब बदलल्यासारखं वाटतं. तेव्हा अचानक झालेल्या धनलाभामुळे अनेकदा व्यक्तींच्या आयुष्यात बदल होतो. त्यांची लाइफस्टाइल, इतरांसोबतचं वागणं-बोलणं यात फरक पडतो. जवळच्या माणसांनाही लोक अशावेळी विसरतात. मात्र अमेरिकेत एका वयोवृद्ध व्यक्तीला लॉटरी लागल्यानंतर त्यानं सर्वात आधी मैत्री निभावली. मित्राला 28 वर्षांपूर्वी दिलेलं वचन त्यानं निभावलं. अमेरिकेतील विस्कॉन्सिन इथं दोन मित्रांनी 1992 मध्ये एकमेकांना अनोखं वचन दिलं होतं. त्या दोघांपैकी एकाला लॉटरी लागताच त्यानं ते पूर्णही केलं. 

रिपोर्टनुसार टॉम कुक आणि जोसेफ फेनी यांनी 1992 मध्ये एकमेकांना भेटल्यावर एक वचन दिलं होतं. जर दोघांपैकी कोणालाही कधीही लॉटरी लागली तर ते पैसे दोघांमध्ये समान वाटून घ्यायचे. दोघांच्यात झालेल्या या भेटीला 28 वर्षे झाली. दरम्यान, गेल्याच महिन्यात Menomonie मध्ये टॉम कुकला लॉटरी लागली. या लॉटरीची रक्कम होती 22 मिलियन डॉलर. भारतीय चलनात याची किंमत जवळपास 165 कोटी रुपये इतकी होते. 

लॉटरी लागताच टॉम कुकने सर्वात आधी मित्र फेनीला कॉल केला. फोनवर त्यांनी 28 वर्षांपुर्वी दिलेल्या वचनाची आठवण करून देत लागलेल्या लॉटरीतील अर्धी रक्कम देणार असल्याचं सांगितलं. तेव्हा काही क्षण फेनीला टॉम गंमत करतोय असंच वाटत होतं. पण टॉमने आपण खरंच अर्धी रक्कम देणार असल्याचं म्हटलं.

फेनीला जेव्हा टॉमने फोनवरून सांगितलं तेव्हा फेनीला विश्वास बसला नाही. फेनी म्हणाला की, गंमत करत आहेस ना भावा? त्यावर टॉम म्हणाला की, वचन तर वचन असतं. यावेळी फेनी भावूक झाला. टॉमने आता निवृत्ती घेतली असून फेनी आधीच निवृत्त झाले आहेत. टॉम म्हणाला की, आता आम्हाला हवं ते करता येईल. निवृत्ती घेण्याची यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. आता सर्व वेळ कुटुंबासोबत घालवणार आणि मनसोक्त फिरणार असंही टॉमने सांगितलं. 

Edited By - Suraj Yadav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com