बराक ओबामांच्या होनोलुलुतून

सॅनफ्रान्सिस्को सोडल्यावर होनोलुलुला (हवाईची राजधानी) पोहोचेपर्यंत विमान चार साडे चार तास प्रशान्त महासागरावर तरंगत होतं.
plane
planeplane

नवी दिल्ली : मुक्काम हवाई, अमेरिका - दिल्ली ते होनोलूलू हे अंतर तब्बल 11,929 कि.मी. तीन डिसेंबरच्या मध्यरात्री युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाने निघालो, तेव्हा प्रवासाचा पहिला टप्पा साडे पंधरा तासांनंतर शिकागो येथे संपला. तिथं चार तास थांबून होनोलुलुची फ्लाईट घेतली ती नऊ तासांची होती. यावेळी मला दिल्ली ते आफ्रिकेतील डीआर काँगो या 2011 मध्ये केलेल्या सुमारे 25 तासांच्या प्रवासाची आठवण होत होती. तो मार्ग होता, दिल्ली ते आदिस अबाबा ते किन्शासा (डीआर काँगोची राजधानी).

सॅनफ्रान्सिस्को सोडल्यावर होनोलुलुला (हवाईची राजधानी) पोहोचेपर्यंत विमान चार साडे चार तास प्रशान्त महासागरावर तरंगत होतं. दिल्ली ते होनोलुलु प्रवासाचे एकूण तास 28. त्यामुळं बसून बसून पाठीला रग लागली होती, तरी प्रवासात साऱ्या सोई असल्यानं कुठेही त्रास झाला नाही. अमेरिकेला यापूर्वी तीन वेळा भेट दिली होती. तथापि, हवाईचा हा पहिलाच दौरा. काश्मीरला जसे पृथ्वीवरील नंदनवन म्हणतात, तसं हवाई हा पृथ्वीवरील दुसरा स्वर्ग. प्रशांत महासागरतील एका भूभागवर असलेल्या धावपट्टीवर विमान उतरताना तळापर्यंत दिसणारे हिरवे-निळेशार पाणी, दूरवर पसरलेल्या कंच हिरव्या टेकड्या व डोंगरांकडे दृष्टी वळली. परिसर नितांत सुंदर.

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित प्रसिद्ध चित्रपटांच्या काही प्रसंगांचं शूटींग होनोलुलु नजिकच्या पर्वतराजीत झालं. इथं जिवंत ज्वालामुखी जसे पाहायला मिळतात, तशीच अमेझऑनच्या खोऱ्याप्रमाणं बारमाही पावसात भिजणारी घनदाट जंगलं व त्यातील समृद्ध वन्यजीवन. हवामान अतिशय अल्हाददायक. वर्षभर सुमारे 22 ते 30 डिग्री. त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा ओढा असतो. या पर्यंटन व्यवसायाला करोनाचा गेल्या दीड दोन वर्षात बराच फटका बसला. तरीही प्रसिद्ध वायकीकी समुद्र किनाऱ्यावरील गर्दी कमी झालेली नाही.

येथे आल्याच्या पहिल्या आठवड्यातच हवाईला समुद्री वादळांनी एवढं झोडपलं की होनोलुलुत कोकणातीली ढगफुटीची आठवण झाली. पाच दिवस संतत धार असल्यानं होनोलुलुच्या काही भागात पाणीच पाणी झालं, पूर आले. महापौर मिच रॉथ यांनी आणिबाणी घोषित केली. ती चार एक दिवस टिकली. पुन्हा वातावरण सुधारलं, अन् सूर्यदर्शन झालं. येथील हवा प्रदूषणमुक्त आहे. दिल्लीत प्रदूषणाने 300 चा आकडा गाठला, तर होनोलुलुत त्याचं प्रमाण केवळ 4 इतके आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचं शालेय शिक्षण इथंच झालं. पुनाहोऊ स्कूल ही ती प्रसिद्ध खाजगी शाळा. बालपणी ते या शाळेत शिकले. तिचं वैशिष्ठ्य असं, की टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धात महासागराच्या महाकाय लाटांवर तरंगत कसरत करणारा व सुवर्ण पदक जिंकणारा कॅरिसा मूर, ऑलिंपिक स्पर्धातून भाग घेणारे तालतरण पटू वॅरन किलोहा, व्हॅलिबॉल पटू एरिक शोजी, व्हीलचेअर टेनिसपटू शेलबी बॅरॉन, गोल्फ पटू मिशेल वेई, अभिनेत्री केली प्रेस्टन (जॉन ट्रोव्होल्टाची पत्नी) हे याच शाळेतून शिकलेले. या महागड्या शाळेचं वार्षिक शुल्क 30 हजार डॉलर्स आहे. येथून पदवी संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांनी ऑलिंपिक स्पर्धा गाजविल्या. त्यामुऴं क्रीडा जगतात शाळेचं नाव गाजतय.

हवाईची माजी राणी लिलिओकलानी हिच्या समर्थकांनी 1900 मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची स्थापना केली, तेव्हापासून पक्ष लोकप्रिय आहे. दुसऱ्या महायुद्धाची सांगता होण्यापूर्वी रिपल्बिलकन पक्षाचा दबदबा होता. पण, पुढे तो फार काळ टिकला नाही. भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या वाशिंग्नटमधील काँग्रेस सिनेटर. तर काही वर्षापूर्वी भारतीय कॅन्सुलेटमध्ये कौन्सुल जनरल म्हणून शीला वाटूमल यांची नेमणूक झाली होती. सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथे आलेल्या भारतातील सिंधी व्यापारी गोविंदराम वाटूमल यांनी हवाईला येऊन सुरू केलेला व्यापार, हॉटेल्स, मॉल्स यांची साखळी आज सर्वत्र पाहावायास मिळते.

दुसऱ्या महायुद्धात ज्या पर्ल हार्बरवर जपानी विमानीनी हल्ला केला, ते होनोलुलुच्या परिसरात आहे. महायुद्धाची सुरूवात येथूनच झाली. त्यामुळे शहराला अनन्य साधारण अयतिहासिक महत्व असून, अमेरिकन सेनादल, वायूदल व नौदलातील माजी अधिकाऱ्यांची संख्या येथे बरीच आहे. त्यांचे सराव सतत चालू असतात. प्रशांत महासागरातील अमेरिकेचा गुआम हा नौदलतळ येथून सव्वासहा हजार मैल आहे. त्यामुळे प्रशांत महासागराची व्यूहात्मक देखरेख करणे अमेरिकेला साध्य झाले आहे

येथील मोलोकोई येथे कुष्ठरोग्यांची सेवा करणारे फादर डॅमिएन म्हणजे म्हणजे हवाईचे बाबा आमटे होत. त्यांच्याबाबत महात्मा गांधी यांना नितांत आदर होता. गांधीजी म्हणतात, की त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करताना त्यांनी जी तन्मयतेने भारतातील माझ्या अऩेक सामाजिक मोहिमांना स्फूर्ती दिली. गांधीची म्हणतात, ``द पॉलिटिकल अँड जर्नालिस्टिक वर्ल्ड कॅन बोस्ट ऑफ व्हेरी फ्यू हीरोज हू कम्पेअर विथ फादर डॅमियन ऑफ मोलोकोई. द कॅथॉलिक चर्च. ऑन द कॅन्ट्रिरी, काऊंट्स बाय थाऊजंड्स ऑफ दोज हू आफ्टर एक्झांपल ऑफ फादर डॅमियन हॅव डिव्होटेड देमसेल्व्ज टू द व्हिक्टिम्स ऑफ लेप्रसी. इट इज वर्थव्हाइल टू लुक फॉर द सोर्सेस ऑफ सच हिरोईझम.’’ फादर डॅमियनबाबत गांधीजींचे काय विचार होते, त्याची नोंद लेखक टी.एन. जगदीशन यांनी 1965 मध्ये प्रसिद्ध केलेल्या `महात्मा गांधी आन्सर्स द चॅलेन्ज ऑफ लेप्रसी’ या पुस्तकात केली आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करताना फादर डॅमियन यांना त्या रोगानं ग्रासलं व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

गांधीजींचा उल्लेख आजही येथे होत असतो, हे पाहून मला सुखद आश्चर्य वाटलं. येथील प्रसिद्ध `हवाई स्टार एडव्हरटायझर’ या दैनिकाच्या मिडविक पुरवणीत 8 डिसेंबर, 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुख्य लेखात पत्रकार जॉन फिंक यांच्या `एनिमल अट्रॅक्शन’ या भूतदयेवरील लेखातील पहिल्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं. लेखाची सुरूवात अशी. ``नाईंटी इयर्स अगो, महात्मा गांधी, ए पर्व्हेअर ऑफ नॉन व्हायोलन्स इन रेझिस्टन्स मूहमेन्ट्स सेड, द ग्रेटनेस ऑफ ए नेशन अँड इट्स मॉरल प्रोग्रेस कॅन बी जज्ड बाय द वे इट्स अनिमल्स आर ट्रीटेड. (एखाद्या देशाची महत्ता आणि नैतिकता जाणायची असेल, तर त्या देशातील प्राण्यांना ते कसे वागवितात, यावरून त्याचे निदान काढता येते).’’

लेखाचा विषय भूतदया व प्राणीमित्र असा आहे. त्यात फिंक यांनी दोन गोष्टींवर वाचकांचं लक्ष वेधलंय. अलीकडे हवाईयन मंक हा सील मासा त्यांच्यावर साचलेल्या बांडगुळांच्या बाधेनं मरण पावला. जगात या प्रकारच्या सील माशांची संख्या धोकादायक पातळीवर केवळ 1400 वर पोहोचली आहे. वेळीच लक्ष दिलं असतं तर तो वाचू शकला असता. त्याला रोग झाला, याचे कारण मांजरांच्या अंगावरील उवा त्याच्या शरीरावर पसरल्या होत्या. दुसरे, म्हणजे काहुलुई विमानतळावर एका मोटारी खाली येऊन दोन कलहंस चिरडले गेले. हवाईच्या वृत्तपत्रातून ही बातमी पहिल्या पानावर छापण्यात आली होती. फिंक म्हणतात, की अमेरिकेतील एनाहेम, क्लिव्हलँड, न्यू ऑर्लियन्स, तुलसा, सिनसिनाटी येथे खुनाच्या घटना होतात, तेव्हा त्यांची दखल घेतली जाते, तीही शेवटच्या पानांवर. माणूस असो की प्राणी अथवा पक्षी, त्यांचं आयष्य तेवढंच मूल्यवान असतं, याची जाणीव आपण ठेवायला हवी. हल्ली समाज संवेदनहीनतेकडे वळत आहे. हे माणुसकीचे निश्चित लक्षण नव्हे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com