दहशतवाद, तापमानवाढ मुख्य अजेंडा; जर्मनीत आजपासून "जी-20' परिषद; मोदींचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

हॅम्बर्ग (जर्मनी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील अन्य आघाडीच्या अर्थव्यवस्थांचे नेत्यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवार)पासून येथे सुरू होत असलेल्या दोन दिवसांच्या "जी-20' परिषदेत दहशतवादाशी लढा, तापमानवाढ आणि जागतिक व्यापार हे मुख्य मुद्दे असतील.

सिक्कीमजवळच्या घडामोडींवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यप शी जिनपिंग यांच्यातील भेटीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. चीनने मात्र या दोन नेत्यांच्या भेटीची शक्‍यता फेटाळून लावली आहे.

"परस्परसंबंध असलेल्या जगाची मांडणी' अशी या परिषदेची थीम असून, सद्यःस्थितीत विविध मुद्‌द्‌यांवरून अनेक नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असताना, विशेषत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तापमानवाढ आणि खुल्या व्यापारासंबंधीचा जाहीर दृष्टिकोन समोर आला असतानाच ही परिषद होत आहे.
परिषदेत सहभागी होणाऱ्या अन्य नेत्यांमध्ये रशियाचे व्लादिमिर पुतीन, तुर्कीचे रेकेप तय्यीप एर्दोगन, फ्रान्सचे इमान्युएल मॅक्रोन आणि ब्रिटनच्या थेरेसा मे यांचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे. 19 देश आणि युरोपियन युनियनने एकत्र येऊन 20 देशांचा गट बनविला आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्‍सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. परिषदेच्या ठिकाणी 15 हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले असून, त्याशिवाय 4 हजार कर्मचारी विमानतळ आणि रेल्वे सुरक्षा हाताळतील.

परिषदेतील चर्चेचे मुद्दे
दहशतवादाशी लढा आणि आर्थिक सुधारणा यांशिवाय "जी-20' परिषदेत मुक्त आणि खुला व्यापार, तापमानवाढ, स्थलांतर, शाश्‍वत विकास आणि जागतिक स्थैर्य यांसारख्या मुद्‌द्‌यांवर चर्चा होईल.

"जी-20' परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिना, कॅनडा, इटली, जपान, मेक्‍सिको, कोरिया, व्हिएतनाम आणि ब्रिटन यांसारख्या देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. त्याशिवाय ते ब्रिक्‍स नेत्यांच्या बैठकीतही सहभागी होतील.
- गोपाळ बागळे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

Web Title: g20 news global news germany narendra modi international news