G-20 शिखर परिषद : इंडोनेशियाने पुतिन आणि झेलेन्स्कींना केले आमंत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin and Volodymyr Zhelensky

G-20 शिखर परिषद : इंडोनेशियाने पुतिन, झेलेन्स्कींना केले आमंत्रित

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला तीन महिने होत आहेत. मात्र, कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, इंडोनेशियाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्रुप ऑफ २० (G-20) परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी ही माहिती दिली आहे.

इंडोनेशिया शांतता प्रयत्‍नात योगदान देण्यास तयार आहे. इंडोनेशियाला G-20 देशांना एकत्र करायचे आहे. वाटून घ्यायचे नाही. शांतता आणि स्थैर्य ही जागतिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचे, व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना विडोडो म्हणाले. G-20 जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानासाठी उत्प्रेरक भूमिका बजावते. या आठवड्यात त्यांनी रशिया (russia) आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संभाषण केले, असेही विडोडो म्हणाले.

हेही वाचा: केंद्राने जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसाठी खर्च केले ९००० कोटी; अहवाल

गुरुवारी विडोडो आणि पुतिन (Vladimir Putin) यांनी फोन संभाषणात रशियन-इंडोनेशियन (russia) सहकार्याच्या मुद्द्यांवर आणि G20 क्रियाकलापांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. त्याचवेळी बुधवारी झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांच्याशी झालेल्या संभाषणात विडोडो यांनी युक्रेनच्या (ukraine) राष्ट्रपतींकडून शस्त्रास्त्रांची विनंती नाकारली आणि सांगितले की इंडोनेशिया मानवतावादी मदत देण्यास तयार आहे.

एका रात्रीत ३८९ लक्ष्यांवर निशाणा

रशियाने युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशिया तोफखाना युनिट्सने रात्रभर ३८९ युक्रेनियन स्थानांना लक्ष्य केल्याची बातमी रॉयटर्सने दिली आहे. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये ३५ नियंत्रण बिंदू, १५ शस्त्रास्त्रे, दारूगोळा डेपो, युक्रेनियन सैन्य आणि त्यांची शस्त्रे ठेवलेल्या अनेक भागांचा समावेश होता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या क्षेपणास्त्रांनी चार दारूगोळा आणि इंधन डेपोवर मारा केला.

Web Title: G20 Summit Indonesia Invited Putin And Zelensky

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top