esakal | जी७ देशांशी बायडेन करणार चर्चा

बोलून बातमी शोधा

G7}

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन येत्या शुक्रवारी जी७ समूहातील नेत्यांशी चर्चा करतील. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या बैठकीत कोरोनाची जागतिक साथ, जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचा सामना अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

जी७ देशांशी बायडेन करणार चर्चा
sakal_logo
By
यूएनआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन येत्या शुक्रवारी जी७ समूहातील नेत्यांशी चर्चा करतील. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या बैठकीत कोरोनाची जागतिक साथ, जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचा सामना अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायडेन यांची जगातील श्रीमंत लोकशाही देशांच्या प्रमुखांबरोबरील ही पहिलीच बैठक आहे. जी७ समूहातील प्रमुख नेतेही गेल्या वर्षी एप्रिलपासून प्रथमच एकत्र येतील. यासंदर्भात व्हाइट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार या बैठकीच्या निमित्ताने बायडेन यांना कोरोनाच्या जागतिक साथीचा पराभव आणि जागतिक अर्थव्यवस्थेची फेरबांधणी यासाठीच्या योजनांबाबत प्रमुख श्रीमंत देशांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. बायडेन लसीचे उत्पादन आणि वितरणाविषयी भाष्य करतील. नव्याने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी देशाची क्षमता वाढविणे तसेच आरोग्य सुरक्षा वित्तपुरवठा यंत्रणा निर्माण करण्यासाठी एकत्रित संघटन आणि सहकार्यावरही त्यांचा भर असेल.

ब्रिटनचे प्रिंस हॅरी आणि मेगन मर्केल यांची गुड न्यूज; दुसऱ्यांदा होणार आई-वडील

चीनचे आव्हान
चीनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी गुंतवणुकीची गरज आणि जागतिक नियम अद्ययावत करण्याचे महत्त्व याविषयी सुद्धा बायडेन चर्चा करतील. अमेरिकेचे अर्थ मंत्री जॅनेट येलेन यांनी जी७ समूहातील सहकाऱ्यांशी गेल्याच आठवड्यात चर्चा केली होती. आर्थिक पीछेहाट भरून काढण्यासाठी वित्त क्षेत्रातील पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

'अश्रू धुराचा वापर झाला नव्हता म्हणून आंदोलकांवर घेतली चाचणी'

अमेरिका फर्स्ट...
रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन यांनी महासत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे घोषवाक्य बनविले होते, पण चार वर्षांच्या खंडानंतर जगातील प्रमुख देश तसेच प्रमुख जागतिक संघटनांशी पुन्हा हस्तांदोलन करण्याचे बायडेन यांचे धोरण असेल. त्यादृष्टिने जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि पॅरिस हवामान  करारातही अमेरिकेने पुनरागमन केले.

Edited By - Prashant Patil