‘गलवान’ला चीनची प्रक्षोभक कृती जबाबदार

‘ड्रॅगन’च्या आरोपाला भारताचे प्रत्युत्तर
‘गलवान’ला चीनची प्रक्षोभक कृती जबाबदार
‘गलवान’ला चीनची प्रक्षोभक कृती जबाबदारsakal

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीसाठी भारताला जबाबदार ठरविण्याचा चिनी प्रयत्न म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे भारताने आज फटकारले आहे. तसेच द्विपक्षीय करार उल्लंघन आणि ताबारेषेवर एकतर्फी बदलाची चीनची प्रक्षोभक कृतीच या हिंसक घटनेच्या मुळाशी असल्याचा प्रहार आज केला.

मागील वर्षी जूनमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यात हिंसक झटापट झाली होती. यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले होते. तर ४५ हून अधिक चिनी सैनिक ठार झाले. मात्र मृत सैनिकांची संख्या दडविणाऱ्या चीनने केवळ पाच जण ठार झाल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. मात्र, भारताने द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करून चिनी जमिनीवर अवैध अतिक्रमण केले तसेच ताबारेषा ओलांडल्यामुळेच गलवान खोऱ्यात हिंसक झटापट झाली असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनच्या या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

‘गलवान’ला चीनची प्रक्षोभक कृती जबाबदार
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातही होणार आता स्वॅब टेस्टिंग 

चीनचे अशा प्रकारचे विधान कधीही मान्य केले जाऊ शकत नाही. पूर्व लडाखमध्ये ताबारेषवर मागील वर्षी जे काही घडले त्याबद्दल भारताची भूमिका स्पष्ट आहे. आतापर्यंतच्या सर्व द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करून ताबारेषेवर यथास्थितीमध्ये एकतर्फी बदल करण्याच्या चीनच्या प्रक्षोभक वर्तनामुळे (सीमेवरील) शांतता आणि सलोखा यावर गंभीर परिणाम झाला आहे. एवढेच नव्हे तर द्विपक्षीय संबंधांनाही याचा फटका बसला आहे, असे प्रत्युत्तर बागची यांनी दिले. तसेच, शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने भारतीय आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांमध्ये सीमावादावर झालेल्या चर्चेचीही आठवण बागची यांनी चीनला करून दिली.

मि.५६ इंची चीनला घाबरतो....!

दरम्यान, चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचा आरोप करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधांना ‘मि.५६ इंची चीनला घाबरतो’ अशा शेलक्या शब्दात लक्ष्य केले. चिनी घुसखोरीबाबत क्रोनोलॉजी समझिये या शीर्षकाची ५५ सेकंदाची चित्रफीत जोडून राहुल गांधींनी हे खोचक ट्विट केले. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चीनचे नाव घ्यायला पंतप्रधान मोदी घाबरतात, असे आरोप राहुल गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांनी केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com