चहातून दिलं विष; Game Of Thrones च्या डेव्हलपरचा खून

lin chi
lin chi

बीजिंग - गेम डेव्हलपर यूझूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकीर लीन ची हे ख्रिसमसच्या दिवशी मृतावस्थेत आढळून आले होते. लीन ची यांची ओळख गेम ऑफ थ्रोन्समुळेही होती. लीन ची यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी अधिक तपास केला. यात त्यांना विष देऊन मारण्यात आल्याचं समोर आलं आहे.

अस्वस्थ वाटू लागल्यानं लीन ची यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्थानिक मीडियाने असं म्हटलं आहे की, त्यांना चिनी चहामधून विष देण्यात आलं होतं. शांघाय पोलिसांनी लीन चीचे सहकारी झू यांना मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे. झू हे यूझूच्या चित्रपट निर्मिती विभागाचे प्रमुख आहेत. 

हुरुन चायनाच्या रिच लिस्टनुसार लीन ची यांची एकूण संपत्ती 6.8 बिलियन युआन म्हणजेच जवळपास 76 अब्ज 60 कोटी रुपये इतकी आहे. शुक्रवारी अनेक कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. यासाठी सर्वजण यूझूच्या कार्यालयाबाहेर एकत्र आले होते.

लीन ची हे चीनच्या गेमिंग मार्केटमधील एक स्टार होते. त्यांनी चित्रपट निर्मितीमध्येही पाऊल टाकलं होतं. त्यांनी 2009 मध्ये यूझूची स्थापना केली होती आणि यशस्वीपणे कंपनीचं नेतृत्व केलं. गेमिंग व्यवसायात मोबाइल गेमिंगमध्ये अमुलाग्र बदल झाले अशा काळातही कंपनीने चांगली वाटचाल केली. यूझू एक व्हिडिओ गेम डेव्हलपर, ब्राउजर आणि मोबाइल गेम्सचे पब्लिशर आहेत. प्रामुख्याने आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मल्टिप्लेअर गेममध्ये वर्चस्व आहे.

लीन ची यांच्या कंपनीने GTArcade गेम तायर केली होती. 2013 मध्ये परदेशात त्यांनी पब्लिश करायला सुरुवात केली. 2014 मध्ये शेन्जेन स्टॉरक एक्स्चेंजमध्येही यादीत नाव आले. त्यांची सर्वात लोकप्रिय गेम League of angels ही आहे. 

प्रसिद्ध गेम गेम ऑफ थ्रोन्स शिवाय यूझू सुपर सेलच्या स्मॅश हिट गेम Brawl Stars चे को-पब्लिशर असलेल्या Tencent होल्डिंग्ससोबतही काम करत आहे. सप्टेंबर महिन्यात यूझूने अमेरिकन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला विज्ञानावर आधारीत कादंबरीला रुपांतरीत करण्याचे अधिकार दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com