esakal | चिनी प्रवाशांना विमानात घेऊ नका; भारत सरकारकडून आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

India China, Chinese Airlines, China, Chinese Travelers

दोन्ही देशातील विमानसेवा अनेक दिवसांपासून स्थगित आहे. पण चिनी प्रवासी अन्य देशातून भारतात दाखल होत आहेत. ज्या देशांतून भारतात येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत त्या मार्गावरुन चिनी नागरिक नोकरी, व्यापार किंवा अन्य कामासाठी भारतात येत आहेत.

चिनी प्रवाशांना विमानात घेऊ नका; भारत सरकारकडून आदेश

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

भारत सरकारने चीनबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध घालण्यात आले असून यासंदर्भात भारत सरकारने सर्व एअरलाइन्सला अनौपचारिक आदेश दिलाय. नोव्हेंबरमध्ये चीन सरकारने भारतीय प्रवाशांसंदर्भात असाच निर्णय घेतला होता. त्यामुळे भारत सरकारच्या या निर्णयाकडे चीनला जशाच तसे प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.     

दोन्ही देशातील विमानसेवा अनेक दिवसांपासून स्थगित आहे. पण चिनी प्रवासी अन्य देशातून भारतात दाखल होत आहेत. ज्या देशांतून भारतात येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत त्या मार्गावरुन चिनी नागरिक नोकरी, व्यापार किंवा अन्य कामासाठी भारतात येत आहेत. अन्य देशात वास्तव्यास असलेल्या चिनी नागरिकांचाही यात समावेश आहे. अशा प्रवाशांना एअर लाईन्समध्ये घेऊ नये, असा अनौपचारिक आदेश भारत सरकारने काढला आहे.  

 #CoronavirusStrain: आणखी दोन देशांमध्ये नव्या कोरोनाची एन्ट्री

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत आणि परदेशी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारने अनौपचारिकरित्या चिनी प्रवाशांवर निर्बंध घालण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत चिनी प्रवाशांना भारतात येण्यासाठी परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.   

अमेरिकन लोकांसाठी पॅकेजला मंजुरी द्यायची सोडून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला​

सध्याच्या घडीला भारतात पर्यटन व्हिसा स्थगित करण्यात आला आहे. पण कामनिमित्त किंवा अन्य काही श्रेणीच्या माध्यमातून परदेशी नागरिकाला भारतात प्रवेश दिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतात दाखल होण्यासाठी बहुतांश चिनी प्रवाशी युरोपातून येत असल्याचेही समोर आले होते. काही एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी भारताकडून लिखित स्वरुपात आदेश मिळावा,असे म्हटले आहे. ज्या चिनी नागरिकांनी तिकीट बूक केले आहे त्यांना कारण देताना आदेश दाखवता येईल, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  
 

loading image
go to top