
Ganesh Festival 2025
Sakal
वाळवा : घर, गाव आणि देशापासून दुरावले तरी परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मनातून गणरायावरील भक्ती कधीच दुरावत नाही. दुबईत राहूनही पेठ (ता. वाळवा) येथील दत्तात्रय यादव यांनी समभाषिक, समविचारी लोकांना एकत्र करून साजरा करत असलेला गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि संस्कारांची अखंड परंपरा जपणारा उत्सव ठरत आहे. परदेशात वस्ती करूनही मनाच्या कोपऱ्यात वसलेला गणराय प्रत्येक भारतीयाला आपल्या संस्कारांची आठवण करून देतो.