
गौतम अदानींचा होणार ग्लोबल लीडरशिप अवॉर्डनं सन्मान
देशातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योजक गौतम अदानी 3 नंबर मध्ये आले आहेत. या यादीत नाव आल्या नंतर गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देऊन, गौरव करण्यात येणार आहे. अमेरिका आणि भारत व्यापार परिषेदेने याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि भारत परिषदेने सांगितल कि दिल्लीमध्ये 7 सप्टेंबरला होणाऱ्या इंडियन आयडियाज समिती मध्ये गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. ब्लूमबर्ग बिलियनयर्स इंडेक्सच्या आकड्यानुसार गौतम आदमी यांची संपत्ती सुमारे 143 बिलियन डॉलर्स आहे.
अमेरिका भारत व्यापार परिषदेच्या या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आणि अमेरिकेचे ऊर्जामंत्री जेनिफर ग्रैनहोम हे उपस्थित राहू शकतात. हा पुरस्कार 2007 पासून भारत आणि अमेरिकेच्या उद्योगपतीना सक्षम करण्याचा प्रयत्न चालू आहे. या कार्यक्रमाला, जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, नॅस्डॅकचे प्रमुख एडेना फ्रेडमन, फेडएक्स कॉर्पोरेशनचे प्रमुख फ्रेड स्मिथ ,आणि कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक, यांसारखे उद्योजक हजरी लावणार आहेत.
अमेरिका आणि भारत व्यापार परिषदेचे अध्यक्ष आणि निवृत्त राजदूत अतुल केशप "म्हणाले की गुजरात मधील पहिल्या सहली दरम्यान गौतम अदानी यांना भेटून भारताच्या उदयाविषयीच्या त्यांच्या व्हिजनवर चर्चा करून आनंद झाला. आम्ही 7 सप्टेंबर दिल्लीत शिखर सम्मेंलन मध्ये गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशीप अवॉर्ड देण्यासाठी मी उत्सुक आहे".
मागील काही काळात अदानी यांच्या संपत्तील मोठी वाढ झाली आहे, त्यांना शेअर बाजारात खुप मोठा नफा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तील लक्षनीय वाढ झाली आहे. अदानी यांच्यासाठी 2022 हे वर्ष खुप भरभराटीचे गेले आहे. ज्यावेगाने त्यांची संपत्ती वाढली आहे. त्यामुळे दुसरे उद्योगपती त्याच्या आजू बाजूला ही येवू शकणार नाहीत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $60 बिलियन पेक्षा जास्त वाढली आहे. गेले काही महिने गौतम अदानी यांच्यासाठी व्यवसायाच्या आघाडीवरही चांगले ठरले आहेत. यादरम्यान त्यांनी एकामागून एक अनेक महत्त्वाचे व्यवहार केले आहेत.