
PM Modi Donald Trump Gaza: गाझामध्ये दीर्घकाळापासून सुरु असलेलं युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. त्यांच्या या योजनेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. समर्थनादाखल मोदी म्हणाले की, इतर देशदेखील गाझा युद्धाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी सहमत असतील. यामुळे हमास आणि इस्रायल युद्ध थांबू शकेल.