esakal | होणारं बाळ मुलगा की मुलगी? जोडप्याने बुर्ज खलीफावरून केलं जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

burj khalifa

एका जोडप्यानं त्यांचं होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे बुर्ज खलिफावर लायटिंग करून जाहीर केलं. हे सांगण्यासाठी दाम्पत्याने मोठी रक्कमही मोजली आहे.

होणारं बाळ मुलगा की मुलगी? जोडप्याने बुर्ज खलीफावरून केलं जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई - जगातील उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. एका जोडप्यानं त्यांचं होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे बुर्ज खलिफावर लायटिंग करून जाहीर केलं. जेंडर रिव्हिल इव्हेंटचे जोडप्याने आयोजन केलं होतं. यासाठी त्यांनी बुर्ज खलिफाची निवड केली. संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या अनस आणि असला मारवाह यांनी मंगळवारी जेंडर रिव्हिल पार्टीचे आयोजन केले होते. यात त्यांनी त्यांचं होणारं दुसरं अपत्य मुलगा आहे की मुलगी हे जाहीर केलं. 

गेल्या अनेक वर्षांपासून आखाती देशात अशा जेंडर रिव्हिल पार्ट्यांचे आयोजन होते. ही बाब तिकडे नवीन नाही. या पार्टीत आई बाबा त्यांचे अपत्य मुलगा असेल की मुलगी हे सांगतात. यासाठी मित्रमंडळी, पाहुणे यांना आमंत्रण दिलं जातं. अशा प्रकारच्या पार्टीला विरोधही मोठ्या प्रमाणात केला जातो. 

अनस आणि असला मारवाह यांचे युट्यूब चॅनेल द अनसला फॅमिलीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. होणाऱ्या बाळाबद्दल सांगण्यासाठी दाम्पत्याने मोठी रक्कमही मोजली आहे. पर्थ नाऊने दिलेल्या वृत्तानुसार दाम्पत्याने बुर्ज खलिफावर आकर्षक लाइटिंगच्या माध्यमातून इट्स अ बॉय असं जाहीर केलं. या पार्टीसाठी एल लाख डॉलर म्हणजेच जवळपास 73 लाख रुपये दाम्पत्याने खर्च केले. दोनच दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.

हे वाचा - हद्दीत आलात तर बघून घेऊ; चीनला या छोट्या देशाची धमकी!

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा आहेत. दुसरीकडे युट्यूबवर असलेल्या व्हिडिओला 15 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आलं आहे. अनेक लोकांनी जेंडर रिव्हिल पार्टीवर टीका केली आहे. दरम्यान, मिडल ईस्ट मॉनिटरनुसार जोडप्याने हा खर्च केला की शहराचे प्रमोशन केलं हे स्पष्ट नसल्याचं म्हटलं जात आहे.

loading image