Omar Tchiani : नायजर बंडाचा 'मास्टरमाइंड' आणि स्वतःला नायजरचा प्रमुख घोषित करणारा जनरल ओमर तिचीयानी कोण आहे?

पश्चिम आफ्रिकन देश नायजरमध्ये लष्कराने सत्तापालट केली आहे.
Omar Tchiani
Omar Tchianiesakal

Omar Tchiani : पश्चिम आफ्रिकन देश नायजरमध्ये लष्कराने सत्तापालट केली आहे. अध्यक्ष मोहम्मद बझौम यांना सत्तेवरून हटवून अटक करण्यात आली. लष्कराने राष्ट्रीय दूरचित्रवाणी वरून या सत्तापालटाची घोषणाही केली आहे. लष्कराच्या या कारवाईवर जगातील अनेक देशांनी टीका केली. ओमर तिचीयानी याने ही सत्तापालट केली आहे.

या घटनेनंतर ओमरने स्वत:ला नायजरचा नवा नेता घोषित केलं आहे. ओमरची नॅशनल कौन्सिल फॉर सेफगार्डिंग ऑफ कंट्री ग्रुपचा नेता म्हणून वर्णी लागली आहे. सत्तापालटानंतर ओमरने लोकांचा पाठिंबा मागितला. पण ओमर कोण आहे? त्याने सत्तापालट का केली जाणून घ्या.

Omar Tchiani
Monsoon Health Tips : गॅरेंटी देऊन सांगतो पावसाळ्यात श्वसनाचे हे आजार तुम्हाला होणारच, आधीच घ्या ही काळजी!

राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक प्रमुख

मीडिया रिपोर्ट्समध्ये, ओमर हा अध्यक्ष मोहम्मद बजौम यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सैनिकांचा प्रमुख असल्याचं म्हटलंय. ओमर एकेकाळी लष्कराशी संबंधित होता, परंतु नंतर राष्ट्रपतींच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली. जिलेट न्यूजनुसार, ओमर हा नायजरच्या पश्चिमेकडील तिल्लोबारी या भागातील आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात तरुण सैन्यात भरती होतात.

Omar Tchiani
Health Tips: खाल्लेली कोणतीही गोष्ट पचत नाहीय? मग लाइफस्टाइलमध्ये हा बदल करणे गरजेचे!

गेल्या 12 वर्षांपासून नायजरच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची कमान ओमरच्या हाती आहे. तो 2011 पासून राष्ट्रपतींच्या सुरक्षा वर्तुळाशी संबंधित आहेत आणि माजी राष्ट्रपती महामदौ इस्सौफू यांचा निकटवर्तीय असल्याचही सांगितलं जातं.

Omar Tchiani
Tori Kelly Health: ग्रॅमी विजेती सिंगर जेवता जेवता जमीनीवर कोसळली! आता कशी..

2018 मध्ये जनरल पदावर बढती

बीबीसीच्या बातमी नुसार, माजी राष्ट्रपती महामाडो इस्सौफू यांनीच ओमरला जनरल पदावर बढती दिली. विशेष म्हणजे मार्च 2021 मध्ये बजोमने सत्ता हाती घेण्यापूर्वीच ओमरने सत्तापालटाचा प्रयत्न थांबवला. 2015 मध्ये जी सत्तापालट करण्याचा प्रयत्न झाला होता त्यात ओमरचाही संबंध होता.

Omar Tchiani
Health Tips: या लोकांनी चुकूनही भेंडीचे सेवन करू नये, फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

आत्ताची सत्तापालट का झाली?

मात्र, यावेळी सत्तापालटाचा प्रयत्न यशस्वी झाला. हे पाऊल का उचलले याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. अलजझीराच्या बातमीनुसार, नायजर तज्ञ पॉल मेली म्हणतात, अशी अफवा आहे की बजौमने सत्तापालट होण्यापूर्वी ओमरची जागा काढून घेण्याचा विचार केला होता. अफवेचे कारण म्हणजे त्यांचे वय (62) आणि लष्करातील विशेषत: प्रेसिडेंशियल गार्डमधील नाराजी असल्याच सांगण्यात येतंय. ते सांगतात की, बजौमने ओमरला काढून प्रेसिडेंशियल गार्डची पुनर्स्थापना करून आपला अधिकार सांगायचा होता.

Omar Tchiani
Mental Health Tips: तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? मग हे उपाय करून बघा

सत्तापालटाचे कारण काय ?

सत्तापालटानंतर ओमरने राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील आपल्या वक्तव्यात देशाला बदलाची गरज असल्याचं म्हटलं होतं. यासोबतच या प्रकरणात कोणीही ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्याने दिला होता. तो म्हणाला, ढासळत्या सुरक्षेमुळे सैनिकांनी सत्ता काबीज केली आहे. बंडखोरांविरुद्धच्या लढाईत माली आणि बुर्किना फासोमधील लष्करी सरकारांमध्ये "वास्तविक सहकार्य" नसल्याची टीकाही त्याने केली. ओमर पुढे म्हणाला की, आमच्या संरक्षण दलांनी आणि लोकसंख्येने नायजरमध्ये असुरक्षितता, मृत्यू, विस्थापन, अपमान आणि निराशा पाहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com