कार्बनच्या प्रमाणात विक्रमी वेगाने वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालातील माहिती

जिनिव्हा : पृथ्वीवरील वातावरणातील कार्बन डाय- ऑक्‍साईडचे प्रमाण 2016 या वर्षात विक्रमी वेगाने वाढले असून, त्यामुळे भविष्यात तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ होऊन समुद्र पातळीत वीस मीटरने वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान संघटनेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालातील माहिती

जिनिव्हा : पृथ्वीवरील वातावरणातील कार्बन डाय- ऑक्‍साईडचे प्रमाण 2016 या वर्षात विक्रमी वेगाने वाढले असून, त्यामुळे भविष्यात तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ होऊन समुद्र पातळीत वीस मीटरने वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान संघटनेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

2016 या वर्षात वातावरणात कार्बन डाय- ऑक्‍साईड ज्याप्रमाणात वाढला, तसे लाखो वर्षांत कधी झाले नव्हते, असे हवामान संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. कार्बन डाय- ऑक्‍साईड हा हरित वायूंमधील प्रमुख घटक असून, त्याचे हवेतील प्रमाण 2015 मध्ये 400 पीपीएम (पार्टस्‌ पर मिलियन) होते. हेच प्रमाण 2016 मध्ये 403.3 पीपीएम झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. ही वाढ गेल्या दशकातील सरासरी वाढीच्या 50 टक्के अधिक वेगाने झाली आहे. औद्योगीकरणाच्या आधी वातावरणात असलेल्या कार्बन डाय- ऑक्‍साईडच्या प्रमाणापेक्षा सध्याचे प्रमाण 45 टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

पुढील वर्षी जर्मनीतील बॉन शहरात विविध देशांचे पर्यावरणमंत्री भेटणार असून, पॅरिस पर्यावरण कराराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कसे करायचे, याबाबत चर्चा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक हवामान संघटनेने प्रसिद्ध केलेला हा अहवाल पॅरिस कराराच्या अंमलबजावणीची अपरिहार्यता दर्शवितो. जागतिक तापमानवाढ दोन अंशांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा उद्देश असलेल्या पॅरिस कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध असून, या करारातून बाहेर पडण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यामुळे युरोप आणि इतर देशांना या करारासाठी दबाव गट निर्माण करावा लागणार आहे.

कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ
कोळसा, तेल, सिमेंट आणि जंगलतोड यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण 2016 मध्ये वेगाने वाढले आणि "एल निनो'मुळे कार्बनची पातळी आणखीनच वाढली, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. गेल्या काही दशकांमध्ये कार्बन डाय- ऑक्‍साईडच्या प्रमाणातील अशी वाढ अनुभवली नव्हती, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जग हे हिमयुगातून बाहेर येत असताना वातावरणातील कार्बनवाढीच्या वेगापेक्षा सध्याचा वेग शंभर पटींनी अधिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याआधी तीस ते चाळीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली असताना कार्बनचे वातावरणातील प्रमाण 400 पीपीएमपर्यंत गेले होते.

Web Title: geneva news A record increase in carbon