ट्रम्प यांनी 'त्या' राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना माघारी बोलावले, पण...

George Floyd Case,Donald Trump
George Floyd Case,Donald Trump
Updated on

वाशिंग्टन : अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर जगभरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत कोरोनाच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असतानाही अनेक जण या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांना आवरण्यासाठी ट्रम्प सरकारने वाशिंग्टन डिसीमध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात केला होता. सध्याच्या घडीला या प्रकरणावरुन तापलेले वातावरण निवळत असून वाशिंग्टन डिसीमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांची तुकडी हटवण्याची घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. जर आवश्यकता वाटली तर पुन्हा जवानांना तैनात करण्यात येईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.  

जॉर्ड फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर वाशिंग्टनमध्ये काही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.  लिंकन मेमोरियल, संसद भवन, ट्रंप यांचे गोल्फ रिसॉर्ट आणि परराष्ट्र विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत याचा ट्रम्प यांना फटकाही बसू शकतो. हिंसक आंदोलन हातळण्यात ट्रम्प सरकार अपयशी ठरल्याची टिकाही करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन ट्रम्प यांच्या विरोधात त्यांची मुलीनेही आंदोलनकर्त्यांची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प आणि तिची आई मॉ मार्ला मॅपल्स यांनी घटनेचा निषेध नोंदवत आंदोलकांना समर्थन दिले होते. या दोघींच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना घरातूनच आव्हान मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाच्या मृत्यूच्या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. गुगल कंपनीने या प्रकरणातीस लढ्याला पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी आर्थिक मदतही जाहीर केली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com