कधी आणि कुठे सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण, चीनने दिली सविस्तर माहिती

china publish white paper over covid 19
china publish white paper over covid 19

बीजिंग, ता. 7 (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपामुळे कोंडी झालेल्या चीनने आपला कोणताही दोष नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोनाची माहिती लपवल्याचा आऱोप चीनवर केला आहे. मात्र सर्व आरोप फेटाळून लावत चीनने कोरोनाबाबतची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. चीनने म्हटले की, वुहानमध्ये सर्वप्रथम 27 डिसेंबर 2019 रोजी न्यूमोनियाचा विषाणू आढळून आला. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग होत असल्याचे 19 जानेवारी 2020 रोजी आढळून येताच त्यास आळा घालण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरु करण्यात आली. श्वेतपत्रिकेतून चीनने स्वतःलाच क्‍लिन चीट देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्राणघातक रोगाची माहिती देण्यात चीनने पारदर्शकता राखली नसल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे प्रचंड जिवितहानी झाली असून जगावर आर्थिक संकट कोसळले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोरोना महामारीच्या आधी मुळातच झडगणाऱ्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून मोठी मेंदी येणे अटळ असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे जागतिक बॅंकेने महामारी नियंत्रणासाठी व्यापक प्रयत्न करून अर्थव्यवस्था सुधारण्याचे आवाहन केले आहे. 

चीनच्या श्‍वेतपत्रिकेमधील मुद्दे 
- वुहानमधील रुग्णालयात 27 डिसेंबर रोजी कोविड-19 विषाणूची नोंद 
- स्थानिक प्रशासनाकडूनतज्ञांना पाचारण 
- रुग्णाची प्रकृती व वैद्यकीय निदानाचे पृथःक्करण करण्याची सूचना 
- संसर्गजन्य रोग, प्रयोगशाळेतील चाचण्यांचे प्राथमिक अहवाल अभ्यासण्याची सूचना 
- निष्कर्ष हाच : विषाणू न्यूमोनियाचा 
- राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या उच्चस्तरीय पथकातील संशोधकांकडूनही अभ्यास 
- अज्ञात कारणांमुळे न्यूमोनियास कारणीभूत ठरणारा विषाणू असे तीन जानेवारी रोजी स्पष्ट 
- दुसऱ्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेसह सर्व देशांना सूचना 
- निदानातील अनिश्‍चिततेमुळे अभ्यास कायम 
-14 जानेवारी रोजी वुहान आणि संपूर्ण हुबेई प्रांतातील प्रयत्न भक्कम करण्याचा निर्णयक 
- त्यावेळी माणसांना संसर्ग होण्याचे माध्यम व मार्ग कोणते याचा अभ्यास बाकी होता 
- संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता तेव्हा फेटाळण्यात आली नव्हती 
- एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग होत असल्याचे सर्वप्रथम 19 जानेवारी रोजी स्पष्ट 
- त्यानंतर काही तासांतलोकांना तशी सूचना 
- 20 जानेवारी रोजी गुआंगडॉंग येथील दोन रुग्णांवरून माणसांपासून संसर्गावर शिक्कामोर्तब 
- नव्या रोगाबद्दल तज्ञांना महिन्याच्या आत सावध केले 
- वुहान व इतर प्रांतांमध्ये सामाजिक पातळीवरील संसर्ग उघड होताच देशव्यापी उपाययोजना लागू 

कोरोना महामारीविरुद्धचा मुकाबला जग जिंकेल, पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस आणि एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. एकजूट म्हणजे ताकद असते, असेही चीनने श्वेतपत्रिकेत आवर्जून नमूद केले आहे. चीनचे श्वासविकार तज्ञ वॅंगगुआंग्फा म्हणाले की, 'माणसांपासून संसर्ग होईल याचे पुरेसे पुरावे आम्हाला 19 जानेवारीपूर्वी मिळाले नव्हते. वुहानमध्ये तज्ञ दाखल झाले तेव्हा कमी तापाचे रुग्ण वाढल्याचे त्यांना आढळले. विषाणूचे उगमस्थान मानले जाणाऱ्या वुहानमधील मासळी बाजाराशी (वेट मार्केट) थेट संपर्क आलेले रुग्ण त्यात नव्हते.'

वटवाघुळ आणि खवले मांजर हे प्राणी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे माध्यम असल्याची शंका व्यक्त केली जात होती, पण त्यास पुष्टी देणारे पुरेसे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे एका माणसापासून दुसऱ्याला संसर्ग होतो का हे सिद्ध करण्याचा निर्णय संशोधकांवर सोपविण्याचे ठरले. त्याबाबत घाईने काही ठरविले असते तर काय परिणाम होतील याची कल्पना नव्हती असंही चीनने सांगितले. 

चीनचे रोगनियंत्रण संस्थेचे संचालक गाओ फू म्हणाले की, 'न्यूमोनियाची कारणे अज्ञात असल्याचे स्पष्ट होताच संसर्गजन्य रोग तसेच रोगकारक पेशींचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून छाननी सुरू झाली. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटना तसेच अमेरिकेसह इतर देशांना परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. त्याशिवाय नव्या कोरोना विषाणूचा जिनोम सिक्वेन्सही जारी करण्यात आला.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com