esakal | जॉर्ज फ्लॉइड मृत्यूप्रकरण; कुटुंबाची मोठी रक्कम घेत खटल्यात तडजोड
sakal

बोलून बातमी शोधा

george floyd

कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात तडजोड करण्‍यात आली आहे. मिनियापोलिस येथील स्थानिक न्यायालय आणि फ्लॉइड याच्या कुटुंबामध्ये २.७ कोटी डॉलरवर (सुमारे १९६ कोटी रुपये) तडजोड झाली आहे.

जॉर्ज फ्लॉइड मृत्यूप्रकरण; कुटुंबाची मोठी रक्कम घेत खटल्यात तडजोड

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात तडजोड करण्‍यात आली आहे. मिनियापोलिस येथील स्थानिक न्यायालय आणि फ्लॉइड याच्या कुटुंबामध्ये २.७ कोटी डॉलरवर (सुमारे १९६ कोटी रुपये) तडजोड झाली आहे. मात्र माजी पोलिस डेरेक चाऊविन याच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू राहणार आहे. तडजोडीसाठी न्यायालयाच्या सदस्यांनी फ्लॉइड कुटुंबाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सुनावणीला उपस्थित राहून तडजोडीच्या बाजूने कौल दिला. नागरी अधिकाऱ्यांच्या खटल्यातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी तडजोड रक्कम असल्याचे वकील बेन क्रम्प यांनी सांगितले. संघराज्यातील नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून फ्लॉइड कुटुंबाने मिनियापोलिस प्रशासनाविरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात खटला दाखल केला होता. त्यासाठी ही तडजोड करण्यात आली. ज्याप्रकारे फ्लॉइडचा मृत्यू झाला तशा घटना यापुढे होऊ नयेत, हा संदेश या तडजोडीतून मिळेल, असा विश्‍वास फ्लॉइडचा भाऊ रोडनी याने व्यक्त केला.  दरम्यान, आरोपी चाऊविनवरील खटल्याच्या सुनावणीसाठी ‘ज्यूरी’ म्हणून सहाजणांची निवड केली आहे. चाउविनने ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याचा आरोप न्यायाधीशांनी निश्‍चित केला आहे.

गेल्या वर्षी मिनियापोलिस येथे कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड याचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. एका पोलिसाने फ्लॉईड याच्या मानेवर पाय दाबला होता. त्यामुळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बुरखा म्हणजे 'धार्मिक अतिरेक'; श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

या घटनेमुळे अमेरिकेच्या अनेक नागरिकांमध्ये रोष होता. लोकांनी पुन्हा एकदा ब्लॅक लाईव्ह मॅटर हे आंदोलन छेडले. हजारो लोकांनी रत्स्यावर उतरुन निदर्शने केले. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसा झाल्याचंही पाहायला मिळालं. हे आंदोलन जगभरात पसरलं होतं. अनेक देशातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जॉर्ज फ्लॉईड याच्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता. 

loading image
go to top