esakal | बुरखा म्हणजे 'धार्मिक अतिरेक'; श्रीलंकेत बुरख्यावर बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

burqa

श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन बुरख्यावर बंदी आणली जात आहे.

बुरखा म्हणजे 'धार्मिक अतिरेक'; श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन बुरख्यावर बंदी आणली जात आहे. यासोबतच एक हजारहून अधिक मदरशांवर आणि इस्लामिक शाळांवर देखील बंदी आणली जात आहे. श्रीलंकाचे जनसुरक्षा मंत्री शरथ वीरासेकरा यांनी वाढत्या कट्टरपंथाला आळा घालण्यासाठी म्हणून हा निर्णय आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.  

हेही वाचा - अंगावरचे सर्व कपडे स्टेजवरच काढले; पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीनं नोंदवला निषेध

मंत्री वीरासेकरा यांनी म्हटलंय की, कॅबिनेटच्या सहमतीसाठी त्यांनी विधेयकावर हस्ताक्षर केले आहेत. या विधेयकामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन मुस्लिम महिलांना चेहरा संपूर्णपणे झाकण्यावर बंदी आणण्यासंदर्भात तरतूद आहे. कॅबिनेटच्या मंजूरीनंतर संसदेत हा कायदा पारित होऊ शकतो. वीरासेकरा यांनी म्हटलं की सुरवातीच्या टप्प्यात देशात मुस्लिम मुलींनी आणि महिलांनी कधीच बुरखा परिधान केला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याचं चलन गतीने वाढतंय. याचं मोठं कारण वाढती धार्मिक कट्टरता आहे. त्यामुळेच, यावर बंदी येणं गरजेचं आहे. अनेक देशांनी गेल्या काही दिवसांत बुरख्यावर बंदी आणली आहे. अलिकडेच स्वित्झर्लंडने देखील जनमताच्या आधारावर बुरख्यावर बंदी आणली आहे. 

हेही वाचा - 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी बुरख्याला बंदी'; भारताच्या शेजारी देशात सरकारचा विचार

मंत्री वीरासेकरा यांच्या म्हणण्यानुसार, ज्या एक हजार मदरशांवर आणि इस्लामिक शाळांवर बंदीचा प्रस्ताव आणला आहे, ते राष्ट्रीय शिक्षण नीतीची खिल्ली उडवत आहेत. कुणालाही काहीही शिकवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. बौद्धबहुल श्रीलंकेमध्ये 2019 मध्ये चर्च आणि हॉटेल्सवरील हल्ल्यानंतरदेखील बुरखा घालण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी कोरोनामध्ये प्राण गमावणाऱ्या मुस्लिमांना दफन करण्याऐवजी दहन करण्याचा आदेश श्रीलंका सरकारने दिला होता. मात्र, नंतर हा निर्णय बदलण्यात आला. 
 

loading image
go to top