जॉर्ज सॉंडर्स यांच्या "लिंकन इन दी बार्डो'स यावर्षीचे "बुकर'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

"लिंकन इन दी बार्डो' ही अमेरिकेचे इतिहासप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 1862 मध्ये त्यांच्या मुलाच्या वॉशिंग्टनमधील दफनभूमीस दिलेल्या भेटीवर आधारित कादंबरी आहे. तिबेटी बौद्ध विचासरणीमध्ये "बार्डो' ही मृत्यु व पुनर्जन्मामधील अवस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर लिहिण्यात आलेल्या या कादंबरीमधील वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीची विशेष प्रशंसा करण्यात आली आहे

लंडन - "लिंकन इन दी बार्डो,' या जॉर्ज सॉंडर्स या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या पुस्तकास या वर्षीचा प्रतिष्ठेचा "मॅन बुकर' पुरस्कार जाहीर झाला आहे. बुकर पुरस्कारासाठी अमेरिकन लेखकांचा विचार करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला होता. यानंतर हा पुरस्कार मिळविणारे सॉंडर्स हे सलग दुसरे अमेरिकन लेखक ठरले आहेत. 2014 आधी या पुरस्कारासाठी ब्रिटन, आयर्लंड व राष्ट्रकुल देशांमधील लेखकांचाच विचार करण्यात येत होता.

"लिंकन इन दी बार्डो' ही अमेरिकेचे इतिहासप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 1862 मध्ये त्यांच्या मुलाच्या वॉशिंग्टनमधील दफनभूमीस दिलेल्या भेटीवर आधारित कादंबरी आहे. तिबेटी बौद्ध विचासरणीमध्ये "बार्डो' ही मृत्यु व पुनर्जन्मामधील अवस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर लिहिण्यात आलेल्या या कादंबरीमधील वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीची विशेष प्रशंसा करण्यात आली आहे.

लघुकथालेखक असलेल्या 58 वर्षीय सॉंडर्स यांनी लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे.

Web Title: George Saunders' 'Lincoln in the Bardo' wins Booker prize