जर्मनी, फ्रान्स, इटलीने थांबवला एस्ट्राझेनेकाचा वापर; लस सुरक्षित असल्याचा WHO चा दावा

vaccine
vaccine

बर्लिन : ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याची प्रकरणे समोर आल्यानंतर जर्मनी, फ्रान्स, इटली, आयर्लंड आणि नेदरलँडने देखील या लसीच्या वापरावर आता बंदी घातली आहे. तर ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपचे व्हॅक्सीनॉलॉजिस्ट प्रो. एंड्र्यू पोलार्ड यांनी म्हटलं की, लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा कसलाही सहसंबंध अद्याप स्पष्ट झाला नाहीये. एका रिपोर्टचा हवाला देत त्यांनी म्हटलं की, ब्रिटनमध्ये रक्तात गुठळ्या होण्याचे सरासरी तीन हजार प्रकरणे समोर येतात. लसीकरणाच्या दरम्यान देखील अशी प्रकरणे नेहमीप्रमाणे येत आहेत मात्र त्यांना लसीकरणाशी जोडलं जात आहे. ब्रिटनच्या औषध नियंत्रक एजन्सी एमएचआरएचे व्हॅक्सीन सेफ्टी लीड डॉ. फिल  ब्रायन यांनी म्हटलंय की, लोकांनी कसल्याही भीतीशिवाय आणि शंकेशिवाय बिनधास्त लस टोचून घ्यावी. 

एस्ट्राझेनेकाचं स्पष्टीकरण
एस्ट्राझेनेका आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केलाय की ही लस सुरक्षित आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यानुअल मॅक्रॉन यांनी म्हटलं की, फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेका लसीच्या वापराला खबरदारी म्हणून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कोणत्या कारणांनी असं केलं जातंय याबाबत मात्र कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाहीये. 

इटलीने देखील सोमवारी खबरदारीचा उपाय म्हणून एस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 विरोधी वापरावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या बनण्यासंबंधी बातम्या आल्यानतंर हे पाऊल उचललं गेलं आहे. इटलीने म्हटलंय की हा निर्णय इतर युरोपिय देशांकडून उचललेल्या पावलांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. आयर्लंड, नॉर्वे आणि जर्मनीने देखील लसीच्या वापरावर बंदी आणली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com