
"चुकीला माफी नाही" पोलिसांशी पंगा घेणाऱ्यांचे सुजवले तोंड; पाहा व्हिडीओ
बिजनोर (उत्तरप्रदेश) : खाकी वर्दीतल्या पोलिसांशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं हे आपल्याला माहिती असेल, अशीच एक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना त्यांचा शोध घेत तोंड सुजेपर्यंत चोप देण्यात आला आहे. ही घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली असून सदर पोलिस कर्मचारी आपली ड्युटी संपवून घरी जात असताना त्याला मारहाण करण्यात आली होती.
हेही वाचा: पुण्यात घडामोड... संजय राऊतांच्या सभेआधीच मनसे नेत्याच्या हाती 'शिवबंधन'
उत्तरप्रदेशमध्ये बिजनोर जिल्ह्यात एक पोलिस कर्मचारी आपली ईदची ड्युटी संपवून बुढनपुरा येथून पोलिस स्टेशनमध्ये परत जात होता. एका सिग्नलवर थांबला असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व एका गाडीला धक्का लागला. ज्या गाडीला धक्का लागला त्या गाडीवर फैजान, मोहम्मद आणि वसीम हे तीनजण होते. त्यानंतर त्या तीन आरोपींनी जाब विचारत पोलिसाला जबर मारहाण करत जखमी केले. मारहाणीत सत्येंद्र नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याला पोटाला दुखापत झाली. त्यानंतर ते तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला बिजनोरमधील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची स्थिती गंभीर झाली असल्यामुळे त्यांना जिल्हा हॉस्पिटलमधून मुरादाबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. घटनेनंतर पोलिसांनी त्या आरोपींचा शोध सुरू केला. त्यांच्या गाडीच्या नंबरच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला. बिजनौरच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या तीन आरोपींची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा: 'तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या, आम्हाला सांगू नका'
अटक केल्यावर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवत चांगलाच चोप दिला. त्यांना कोर्टात हजर केले गेले तेव्हा त्यांचे तोंड सुजलेले दिसत होते. एकाला तर नीट चालताही येत नव्हतं. स्टेशनमध्ये पोलिसांना हात जोडून माफी मागताना हे आरोपी दिसत आहेत. सदर घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी शेअर केला आहे. खाकीत असलेल्या पोलिसांशी पंगा घेणे त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.
Web Title: Criminal Beat Police In Uttarpradesh Police Custody Beat Till Cry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..