अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात 24 ठार; सुदैवाने राष्ट्रपती बचावले

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्तिशाली बॉम्स्फोट घडविण्यात आले. हा बॉम्बस्फोट परवान शहरामध्ये सकाळी झाला. या बॉम्बस्फोटात राष्ट्रपती अशरफ गनी हे बालंबाल बचावले. मात्र, यामध्ये 24 जण ठार झाले तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

काबुल : अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्तिशाली बॉम्स्फोट घडविण्यात आले. हा बॉम्बस्फोट परवान शहरामध्ये सकाळी झाला. या बॉम्बस्फोटात राष्ट्रपती अशरफ गनी हे बालंबाल बचावले. मात्र, यामध्ये 24 जण ठार झाले तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीवर पहिला बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये 24 जण ठार झाले. याबाबतची माहिती टोलो न्यूजने दिली आहे. हा हल्ला सकाळी झाला. या हल्ल्यातून राष्ट्रपती गनी सुखरुप बचावले आहेत. या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या स्फोटामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती अशरफ गनी यांच्या परिचयाच्या व्यक्तीने दिली. 

कुटुंबीयांनी धरला दुसर्‍या लग्नाचा आग्रह अन् त्याने घेतली उडी

परवानमधील हल्ला हा आत्मघाती 

परवानमध्ये झालेला हा हल्ला आत्मघाती होता. हल्लेखोर बाईकवरून आला होता, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

नितीन गडकरी यांना मित्रपक्ष रासपकडून घरचा आहेर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghani unhurt as blast kills dozens at Afghan presidents rally