काश्मिर ताब्यात घेतल्यानंतर, भारतावर आक्रमण करु; शोएब अख्तर बरळला

सकाळ ऑनलाईन
Friday, 25 December 2020

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळला आहे

नवी दिल्ली- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळला आहे. मुस्लीम काश्मीरवर ताबा मिळवतील आणि त्यानंतर भारतावर विजय मिळवतील, असं तो म्हणाला आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात तो 'गझवा-ए-हिंद' बाबत बोलत आहे.  'गझवा-ए-हिंद'चा अर्थ 'भारताविरोधात पवित्र युद्ध' असा होतो. हदिथमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रावळपिंडी एक्सप्रेस म्हणतोय की, आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये लिहिण्यात आलंय की गझवा-ए-हिंद घडून येईल आणि अटक नदी दोनदा रक्ताने लाल होईल. अफगाणिस्तानमधून सैन्य अटक पर्यंत पोहोचेल, असं तो म्हणाला. शोएबच्या या वक्तव्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरलं आहे. 

येशू ख्रिस्त नक्की दिसायचे तरी कसे? काय सांगतो इतिहास 

'गझवा-ए-हिंद'चा उल्लेख कट्टर इस्लामिक धर्मगुरू आणि दहशतवादी करत आले आहेत. या संकल्पनेनुसार हिंदू आणि मुस्लीमांमध्ये घमासान युद्ध होईल. त्यानंतर मुस्लीम हिंदू असलेल्या भारतावर विजय मिळवतील. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने दहशतवाद्यांना भरती करुन घेण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला आहे. या संकल्पनेद्वारे जैशने भारतीय भूमिवर केलेल्या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. 

जैशने पाकिस्तानमधील तरुणांना 'गझवा-ए-हिंद'ची भूरळ पाडून जिहादसाठी तयार केलं आहे. इस्लाम हा पवित्र धर्म आहे आणि या युद्धांमध्ये जे भाग घेतील त्यांना 'जन्नत' मिळेल, असं तरुणांना सांगितलं जातं. अनुमानानुसार, युद्ध सीरियामधून सुरु होईल. काळे झेंडे घेतलेलं इस्लामिक सैन्य भारतावर आक्रमण करेल, भारताला जिंकून येथील सर्व हिंदूंना मुस्लिम करण्यात येईल. 

 

दरम्यान, शोएब अख्तर याच्या वक्तव्यामुळे भारतात संताप आहे. शोयबचे भारतात अने फॅन आहेत, पण त्याच्या या वक्तव्याने त्यांना धक्का बसला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghazwa e Hind capture Kashmir and then invade India said pakistan Shoaib Akhtar