
'देवाला कुणी बघितलं' यानुसार येशू ख्रिस्त नक्की दिसत कसे होते हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही किंवा दावा करू शकत नाही. आपण जी प्रतिमा तयार केली आहे तसेच येशू दिसत होते का? याचबद्दल जाणून घेऊया.
नागपूर : येशू ख्रिस्त असं नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एक प्रभावी प्रतिमा उभी राहते. उंच शरीर, लांब सडक केस, लांब पांढऱ्या रंगाची दाढी, पांढऱ्या रंगाचा सदरा असा येशू ख्रिस्तांचा पेहराव फोटो किंवा चित्रांमध्ये नेहमीच दिसतो. यापुढे जाऊन खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये किंवा ढगांमध्येही येशूची प्रतिमा दिसत असल्याचा दावा अनेक लोक करतात. पण 'देवाला कुणी बघितलं' यानुसार येशू ख्रिस्त नक्की दिसत कसे होते हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही किंवा दावा करू शकत नाही. आपण जी प्रतिमा तयार केली आहे तसेच येशू दिसत होते का? याचबद्दल जाणून घेऊया.
आपण आता जी येशूची प्रतिमा किंवा चित्र बघतो ते चित्र चौथ्या शतकात बायझन्टाइनच्या काळापासून रुळली. येशूंचं बायझन्टाइन काळातलं चित्रण प्रतीकात्मक होतं. म्हणजेच त्यात ऐतिहासिक अचूकतेला महत्त्व नव्हतं, तर अर्थपूर्णत्वाला महत्त्व होतं. रोममधील सान्ता पुदेन्झिआना या चर्चमध्ये उच्चासनावरच्या नक्षीदार संगमरवरी प्रतिमेमध्येही दिसतं. या प्रतिमेनुसार लांब केस व दाढी असलेल्या सिंहासनाधिष्ठित ऑलम्पियन झेउसच्या पुतळ्याशी साधर्म्य सांगणारी ही प्रतिमा होती. श्विक राजाच्या रूपात दाखवू पाहणाऱ्या बायझन्टाइन कलाकारांनी झेउसच्या तरूण आवृत्तीद्वारे येशूंची प्रतिमा निर्माण केली आणि हीच प्रतिमा त्यानंतर प्रचलित झाली. मग असं असेल तर नक्की येशू दिसत होते तरी कसे?
त्याकाळी श्रीमंत लोक विशेष प्रसंगांच्या वेळी लांब रंगेबिरंगी झगे घालत होते. बऱ्याचवेळी येशूंना अशा प्रकारचा लांब झग्यामध्ये दाखवण्यात येतं. मात्र आपल्या उपदेशांमध्ये येशू ख्रिस्त हे असे लांब झगे घालणाऱ्या लोकांचा विरोध करतात त्यामुळे येशू अशा प्रकारचे झगे घालत नसावेत हे मानावं लागेल.
सर्वसाधारणतः येशूंच्या काळातला पुरुष गुढग्यापर्यंतचा अंगरखा (चितोन) घालत असे आणि स्त्रिया पावलाच्या सांध्यापर्यंत जाणारा अंगरखा घालत असत. यात अदलाबदल केली, तर ते एक निश्चित विधान मानलं जात असे पण अंगरख्यांवर बहुतेकदा खांद्यापासून खालच्या शिवणीपर्यंत रंगीत पट्ट्या असत आणि एकसंध पेहराव म्हणून हा अंगरखा शिवला जात होता. अशाच प्रकारचा पेहराव येशू करत असावेत. त्याकाळी पुरुष उच्च दाराजक्सचे नसतील किंवा श्रीमंत नसतील तर ते रंगेबिरंगी कपडे परिधान करत नव्हते.
तीन अनुयायी येशूंसोबत प्रार्थनेसाठी एका पर्वतावर जातात आणि येशूंमधून प्रकाशकिरण बाहेर पडायला लागतात. मार्क नमूद करतो त्यानुसार, येशूंचा हिमॅटिआ चकाकायला लागला, तीव्र शुभ्र झाला, पृथ्वीवरच्या कोणत्याही विरंजकाला इतकी शुभ्रता आणता आली नसती." त्यामुळे या रूपांतरापूर्वी येशू सर्वसामान्य माणसासारखाच दिसत असल्याचे मार्कने नमूद केले आहे. सर्वसामान्य कपडे घालणारा, म्हणजेच इथे रंग न दिलेला लोकरीचा अंगरखा घालणारा पुरुष अभिप्रेत आहे.
सुरुवातीच्या काळात लोक येशू ख्रिस्तांना स्वर्गस्थ सत्ताधीश मनात नव्हते त्यामुळे त्यांची प्रतिमा तयार करताना लांब दाढी किंवा केस दाखवत नव्हते. यात येशूंच लहान स्वरूप दाखवण्यात येत होतं. मात्र भटक्या स्वरूपातील तत्वज्ञ व्यक्तीला दाढी असावी हा प्राथमिक अंदाज आहे. मानेवर रुळणारे लांबलचक केस आणि दाढी, हे ईश्वरी वैशिष्ट्य मानलं जात होतं, त्यामुळे पुरुषांनी त्याचं अनुकरण करायचं नसे. तत्त्वज्ञ मंडळीदेखील त्यांचे केस तुलनेने छोटेच ठेवत असत.
तत्त्वज्ञ म्हणून 'निसर्गानुरूप' रूपानुसार, जुदिआ काप्ता नाण्यांवरच्या पुरुषांप्रमाणे, येशूंना छोटीशी दाढी असणं शक्य आहे. लांब केस हे कट्टर धर्माचरणाची प्रतिज्ञा केलेल्या व्यक्तींपैकी असल्याची ओळख तत्काळ पटत असे. ते काही कालावधीसाठी स्वतःला ईश्वरापाशी समर्पित करत, वाइन पीत नसत, स्वतःचे केस कापत नव्हते. मात्र येशू बऱ्याच ठिकाणी वाईन पिताना दिसतात त्यामुळे यात तफावत आढळते.
नक्की वाचा - Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा उद्योजकांची गगनभरारी
सध्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या बायझन्टाइन रूपातील येशूंपेक्षा मोझेसच्या प्रतिमेच्या रूपातील ऐतिहासिक येशूंचं रूप जास्त अचूक आहे, एवढं निश्चित: त्याचे केस छोटे आहेत आणि हलकीशी दाढी आहे, आणि त्यांनी आखूड अंगरखा घातला आहे, हात तोकडे आहेत आणि त्याने हिमॅटिऑन परिधान केला आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ