ऑस्कर नामांकनातील दिग्गजांसाठी ‘गिफ्ट बॅग’

वृत्तसंस्था
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

ही बक्षिसे गरज म्हणून नव्हे तर या कलावंतांच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक आणि आयुष्यातील गौरवास्पद कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्ही श्रीमंत वा प्रसिद्ध असण्याची गरज नाही.
- लॅश फॅरी, संस्थापक, डिस्टिंक्टिव्ह असेस्ट

वॉशिंग्टन - हॉलिवूड असो की बॉलिवूड, चंदेरी दुनियेतील हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार विजेत्यांसाठी चित्रपटांमध्ये चांगले व महत्त्वाच्या भूमिका मिळविण्यासाठी आणि कामाचा मोठा मेहनताना मिळण्यासाठी दरवाजे खुले करून देतो. यंदा तर बक्षिसांचा वर्षावच होणार आहे. ज्यांचे नाव पुरस्कारांच्या नामांकनात आहेत अशा सर्वांना ही ‘गिफ्ट बॅग’ मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस अँड सायन्सेस’ या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र ही बक्षिसांची ही पोतडी या संस्‍थेतर्फे नाही, तर ‘डिस्टिंक्टिव्ह असेस्ट’ या लॉस एंजिल्समधील संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. ‘आम्ही एकत्रित केलेले हे सर्वाधिक मूल्य आहे, असे ‘डिस्टिंक्टिव्ह असेस्ट’चे संस्थापक लॅश फॅरी यांनी सांगितले आहे. गेल्या १८ वर्षांपासून हे अशा बॅगची निर्मिती करीत आहेत. 

चीनमध्ये कोरोनाग्रस्त संशयितांची धरपकड; परिस्थिती हाताबाहेर

आँस्करसाठी नामांकन झालेल्या २० अभिनेते आणि अभिनेत्रींना तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळालेल्या पाच पुरुषांना या वर्षी या बॅगमधून अक्षरशः घबाड मिळणार आहे. यात ७८ हजार डॉलर, १२ दिवसांची क्रूझ सफर, २० हजार डॉलर किमतीची सौंदर्यप्रसाधनांचा समावेश आहे. याचप्रमाणे कपडे, इलेक्ट्रॉक्निक गॅझेट, २४ कॅरेट सोन्याचे आवरण असलेले ‘व्हेप पेन’ (धूम्रपानासाठी वापरले जाणारे पेनासारखे उपकरण) अशा ८० भेटीही यामध्ये आहेत. लिओनार्डो डीकॅप्रिओ याला डोळ्यासमोर ठेवून ‘व्हेप पेन’ची निवड केल्याचे फॅरी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gift Bag for Oscar Nominees Giants