
मोदीजी; मला भारतातील युवकासोबत लग्न करायचे आहे. पण, सीमा बंद असल्यामुळे येता येत नाही. कृपया सीमा खुल्या करा, असे आवाहन पाकिस्तानमधील एका युवतीने केले आहे.
इस्लामाबाद (पाकिस्तान): मोदीजी; मला भारतातील युवकासोबत लग्न करायचे आहे. पण, सीमा बंद असल्यामुळे येता येत नाही. कृपया सीमा खुल्या करा, असे आवाहन पाकिस्तानमधील एका युवतीने केले आहे.
पाकिस्तानातील 40 टक्के वैमानिक बनावट...
कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असल्यामुळे अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लाहोर येथील रहिवासी असलेल्या समायलाचा (वय 35) साखरपुडा भारतातील कमल कल्याण (मधूबन कालोनी, जालंधर) यांच्यासोबत 2015 मध्ये झाला आहे. त्यांना विवाह करायचा आहे पण लॉकडाऊनमुळे करता येत नाही.
कमल यांचे वडील ओम प्रकाश यांनी समायलाच्या पुर्ण कुटुंबीयांच्या भारत व्हिसासाठी दस्तावेज तयार करुन दिले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांचा पाठवता आले नाही. यामुळे लग्नही होत नाही. समायलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विदेश मंत्री यांच्याकडे सीमा उघड्या करण्याबाबत निवेदन केले आहे. दोन्ही देशांच्या सीमा उघडल्यानंतर आम्हाला भारतात येता येईल आणि आमचा विवाह होऊ शकेल.
पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात श्री हरगोबिंदपूरमध्ये राहणारा अमित याचे कराची येथे राहणाऱ्या सुमसबरोबर विवाह ठरला आहे. पण, कोरोनामुळे त्यांचाही विवाह पुढे जात आहे.