
हॉटेलच्या वायफायला गर्लफ्रेंडचा फोन ऑटोमॅटिक कनेक्ट झाल्यानं तरुणाने ब्रेकअप केल्याचा प्रकार समोर आलाय. फोनचं वायफाय कनेक्ट झाल्याचं दिसताच तरुणाने तू धोका दिलास म्हणत प्रेमसंबंध तोडले. दक्षिण पश्चिम चीनच्या चोंगकिंगमध्ये हा प्रकार घडलाय. ली नावाची तरुणी बॉयफ्रेंडसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी हॉटेलमध्ये चेक इन करताना तिचा फोन हॉटेलच्या वायफायला ऑटोमॅटिक कनेक्ट झाला.