‘भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी फटका शक्य’ 

वृत्तसंस्था
Friday, 4 September 2020

दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै ते सप्टेंबर २०२०) भारताची अर्थव्यवस्था आणखी खालावण्याची शक्यता आहे. विकासदरही ऐतिहासिक नीचांकी उणे २५.६ टक्क्यांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे गोपीनाथ यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क -  कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-२० देशांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता जागतिक नाणेनिधीच्या (आयएमएफ) अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केली आहे. 

यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै ते सप्टेंबर २०२०) भारताची अर्थव्यवस्था आणखी खालावण्याची शक्यता आहे. विकासदरही ऐतिहासिक नीचांकी उणे २५.६ टक्क्यांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे गोपीनाथ यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व जी-२० देशांचा विकासदर चालू वर्षांत उणेच राहण्याची शक्यता आहे. या वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये विकासदर काहीसा सुधारण्याची शक्यता आहे, असे गोपीनाथ यांनी म्हटले आहे. तसेच दुसऱ्या तिमाहीत चीनचा विकासदर सर्वाधिक वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने जी-२० देशांची अर्थव्यवस्था या वर्षातील पहिल्या सहामाहीत नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gita Gopinath an economist at the International Monetary Fund