मायक्रोसॉफ्ट-गिटहब एक होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

गिटहब ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी विकत घेण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे. हा करार साडेसात अब्ज डॉलरचा असेल.

नवी दिल्ली - गिटहब ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी विकत घेण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे. हा करार साडेसात अब्ज डॉलरचा असेल.

मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरचे सोर्सकोड सहजपणे उपलब्ध नसतात, तर गिटहब ही कंपनी इतरांना याबाबतीत सहकार्य करते. त्यामुळे या दोन वेगळ्या भूमिका असलेल्या कंपन्या आता एक होत आहेत.

सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांना अधिक मोकळीक, पारदर्शकता आणि संशोधन यासाठी या कराराचा फायदा होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With GitHub, Microsoft is buying a crucial part of the software ecosystem