शी जिनपिंग साधणार हॅट्‌ट्रिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शी जिनपिंग

शी जिनपिंग साधणार हॅट्‌ट्रिक

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या उच्चपदस्थांच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कालावधीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला. याशिवाय गेल्या शंभर वर्षातील पक्षाने मिळवलेल्या यशाची दखल घेणारे ठरावही मंजूर करण्यात आले. चीनमध्ये दर दहा वर्षांनी संपूर्ण सरकार बदलते. मात्र, चेअरमन माओ यांच्याएवढा स्वत:चा दर्जा करून घेतलेले जिनपिंग हे या नियमास अपवाद ठरणार आहे.

या आधी केवळ माओ आणि त्यांच्या नंतरचे अध्यक्ष डेंग जिओपिंग यांना अतिरिक्त कारकिर्द मिळाली होती. त्यामुळे पक्षाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच अध्यक्षांची कारकिर्द वाढवून देणारा ठराव कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. जिनपिंग यांची दुसरी टर्म पुढील वर्षी संपत आहे. यावेळी त्यांचे इतर सर्व मंत्री निवृत्त होणार आहेत. जिनपिंग मात्र त्या पुढील टर्म आणि कदाचित आजीवन अध्यक्षपदावर राहतील.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

पक्ष कार्यकर्ता ते सर्वसत्ताधीश

शी जिनपिंग यांचे वडिल हे देशाचे उपपंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या उदारमतवादी मतांमुळे चेअरमन मात्र यांनी त्यांना त्रास दिला होता. शी जिनपिंग यांनी पक्ष कार्यकर्ता ते देशाचे उपाध्यक्ष असा प्रवास अत्यंत कष्टाने आणि संयमाने केला. हु जिंताओ यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ते देशाचे उपाध्यक्ष होते. २०१२ मध्ये देशाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत वेगाने लष्कराची आणि पक्षाचीही सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. इतकी अनिर्बंध सत्ता केवळ माओ यांनीच उपभोगली होती.

loading image
go to top