अणुबॉम्बचे बटण माझ्या टेबलावर: किम जोंग

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

अणुबॉम्बचे बटण माझ्या टेबलावर आहे. मी कधीही ते दाबू शकतो. असा इशारा देऊन मी कोणालाही इशारा देत नसून, वास्तविकता सांगत आहे. या वर्षात आमच्या अण्वस्त्रांच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही.

सेऊल : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन याने नववर्षाच्या सुरवातीलाच जगाला इशारा देत अणुबॉम्बचे बटण माझ्या टेबलावरच असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून निर्बंध आणण्यात आले असूनही त्यांना अण्वस्त्रे चाचण्यांचा कार्यक्रम 2018 मध्ये कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून सतत उत्तर कोरियाला इशारा देण्यात येत असला तरी उत्तर कोरियाने आता नववर्षाच्या सुरवातीलाच जगाला धमकी दिली आहे.

उत्तर कोरियाचा अध्यक्ष किम जोंगने म्हटले आहे, की अणुबॉम्बचे बटण माझ्या टेबलावर आहे. मी कधीही ते दाबू शकतो. असा इशारा देऊन मी कोणालाही इशारा देत नसून, वास्तविकता सांगत आहे. या वर्षात आमच्या अण्वस्त्रांच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. आम्ही 2017 मध्ये अण्वस्त्रे विकसनाबाबत आखलेला कार्यक्रम पूर्ण केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global news Nuclear button always on my desk says Kim Jong un