Global News : पादरी, नन पॉर्न पाहतात, त्याने मन दुर्बल होतं; पोप फ्रान्सिस यांचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pope Francis
Global News : पादरी, नन पॉर्न पाहतात, त्याने मन दुर्बल होतं; पोप फ्रान्सिस यांचा धक्कादायक खुलासा

Global News : पादरी, नन पॉर्न पाहतात, त्याने मन दुर्बल होतं; पोप फ्रान्सिस यांचा धक्कादायक खुलासा

पॉर्न साईट्सचा मुद्दा कायमच चर्चेत आणि वादात असतो. ऑनलाईन पॉर्नबद्दल आता ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. पादरी आणि नन हेही ऑनलाईन पॉर्न पाहतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. फक्त चाईल्ड पॉर्न नव्हे तर आपण अडल्ट पॉर्नबद्दलही बोलत आहोत, असं पोप फ्रान्सिस म्हणाले आहे.

हेही वाचा: Global News : हेल्मेटसक्ती विरोधात लढणाऱ्या वकिलाचा हेल्मेट न घातल्यानेच मृत्यू

यावेळी त्यांनी पादरी आणि नन यांना आपल्या फोनमधून पॉर्न वेबसाईट्सच्या लिंक आणि अॅप डिलीट करण्याचं आवाहनही केलं आहे. वेटिकन सिटी इथं आयोजित एका कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांना सोशल मीडियाच्या वापरावरुन प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना पॉर्नोग्राफीबद्दल विचारणा झाली असता ते म्हणाले, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, यामुळे आपली आत्मा दुर्बल होते. वाईट शक्ती तिथूनही येतात. त्या आपल्या मनालाही दुर्बल करतात."

हेही वाचा: Global Warming : यंदाचा सप्टेंबर सगळ्यात 'हॉट'; गेल्या १४३ वर्षांचा विक्रम मोडला!

पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले, पादरी आणि नन यांना एखाद्या आजाराप्रमाणे पॉर्नोग्राफीची लागण झाली आहे. या माध्यमातून वाईट शक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश करत आहेत." यासोबत त्यांनी मोबाईलचा प्रामाणिकपणे वापर करण्याचं आवाहन केलं आहे . तसंच आपल्या मोबाईलमधून पॉर्न व्हिडीओज, लिंक्स डिलीट करुन टाका, असं आवाहनही पोप फ्रान्सिस यांनी केलं आहे.