स्थितप्रज्ञ शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

माझे भाग्य की मला सर स्टीफन हॉकिंग यांच्या हाताखाली शिकता आले. ‘पीएच.डी.’ झाल्यावर १९८०मध्ये मी पुढील संशोधनासाठी केंब्रिजला गेलो. त्या वेळी त्यांचे ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. अशा व्यक्तीच्या हाताखाली शिकणे हा आनंददायी अनुभव होता. त्यांच्या आजाराबद्दल ऐकून होतो; पण प्रत्यक्ष पाहिल्यावर वेगळाच अनुभव आला.

त्यांच्या देहबोलीतून कमालीची जिद्द जाणवत होती. त्यांना बोलायला प्रचंड त्रास होत असे. केवळ एका बोटाच्या आधाराने ते समोरच्याशी तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद साधत. माझ्या दृष्टीने ते उत्तम संवादक होते. आम्हाला या ‘गुरू’ला प्रश्‍न विचारण्याची संधी मिळाली. कितीही प्रश्‍न विचारले तरी ते चिडत नसत.

शांतपणे समोरच्याचा प्रश्‍न ऐकून घेत. प्रश्‍न विचारल्यानंतर त्याचे उत्तर द्यायला त्यांना तांत्रिक विषयामुळे वेळ लागे. अवघ्या दोन-तीन शब्दांत ते त्या प्रश्‍नाचे अचूक आणि मार्मिक उत्तर देत. कधी कधी प्रश्‍नाला ते स्मितहास्य करून उत्तर देत. त्यांनी आपल्या संशोधनात आजारपण आडवे येऊ दिले नाही. एक शिक्षक म्हणून आमच्यासाठी ते खूप प्रेरणादायी आहे. आपले संशोधन सर्वसामान्य व्यक्तींनाही समजायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम पद्धतीने ते विषय समजावून सांगत.
- सोमक रायचौधरी, संचालक, आयुका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies somak raichaudhary article