युरोप, आफ्रिकी, आशियायी देशांची होरपळ

‘नासा’ने मांडला सौरदाह, युरोपातील अनेक देशांची स्थिती बिकट
global warming  Europe Africa Asian countries human quality of life NASA
global warming Europe Africa Asian countries human quality of life NASAsakal

न्यूयॉर्क : जागतिक तापमानवाढीमुळे अवघ्या सृष्टीचा समतोलच ढासळू लागला असताना युरोप, आशिया आणि आफ्रिकी देशांना उष्णतेच्या लाटांचा जबर फटका बसला असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांवरून दिसून आले आहे. ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरच्या मॉडेलिंग अँड अॅसिमिलेशन ऑफिसचे प्रमुख स्टीव्हन पॉसन यांनी सांगितले की, ‘‘ विविध ठिकाणांवर वातावरणीय बदलांचा पॅटर्न दिसून येतो आहे. एक मोठा परिसर उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळत असून हरित गृह वायूंच्या उत्सर्जनामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम मानवी जीवनमानावर देखील होतो आहे.’’ सध्या अनेक युरोपीय देशांना उष्णतेच्या लाटेचा जबर फटका बसला आहे.

केवळ रात्रीच थंडी

मागील दहा दिवसांच्या कालावधीत युरोपातील अनेक देशांतील तापमानाची वाटचाल ही ४० अंश सेल्सिअसच्या दिशेने सुरू असून केवळ रात्रीच थंडावा जाणवतो आहे. स्पेनमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत ७४८ जणांचा बळी गेला असून येथील उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे.

३१ हजार लोकांना हलविले

फ्रान्समध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून उष्ण वाऱ्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वणव्यांमुळे १४ हजार ९०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गिरोंडे परिसरातील ३१ हजार लोकांना वणव्यांच्या भीतीमुळे घर सोडावे लागले आहे. सातत्याने या उष्णतेच्या लाटा येण्याचा धोका असून त्यांचा कालावधी देखील मोठा असेल. सध्या युरोपातील अनेक देशांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असल्याने वणवे विझविण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

युरोपमध्ये चटका वाढला

  • पश्चिम युरोपमध्ये अनेक देशांत वणव्यांचा भडका

  • पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्सचा काही भाग होरपळला

  • वणवे पेटणाऱ्या देशांत तीव्र स्वरूपाचा दुष्काळ

  • अर्ध्यापेक्षा अधिक युरोपीय देशांना वणव्यांचा धोका

  • आगीच्या भीतीने हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले

  • इटलीच्या अनेक भागांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ

  • ब्रिटनमध्ये उष्णतेमुळे रेल्वे रूळाचा आकारही बदलला

  • अनेक ब्रिटिश शाळांमध्ये जलतरण तलावांची निर्मिती

तापमान वाढता वाढता वाढे

  • पोर्तुगालचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर

  • ब्रिटनमध्ये विक्रमी ३९.१ अं.से तापमानाची नोंद

  • फ्रान्सच्या ब्रिट्टानी प्रांताचे तापमान ३९.३ अंशांवर

  • आयर्लंडच्या डब्लिनचे तापमान ३३ अंशांवर

  • बेल्जियमचा पारा यंदा ४० अंशांच्याही पुढे जाणार

  • अनेक युरोपीय देशांवर दुष्काळाचे सावट गडद

युरोप, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांना उष्णतेच्या लाटांचा जबर फटका बसतो आहे. १३ जुलै २०२२ रोजी उपग्रहांच्या माध्यमातून टिपण्यात आलेल्या छायाचित्रात अनेक ठिकाणांवरचे तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्याही पुढे गेल्याचे दिसून येते.

असाही भडका

  • ४३ अंश सेल्सिअस - उत्तर स्पेनचे उच्चांकी तापमान

  • २० ठिकाणांवर - स्पेनमधील वणवे नियंत्रणाबाहेर

  • ३० हजार - फ्रान्समध्ये वणव्यामुळे लोकांचे स्थलांतर

  • १००० - संग्रहालयातील प्राण्यांनाही हलविले

  • तीन हजार हेक्टर - वणव्यात जळालेलीपोर्तुगालची संपदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com