
जागतिक पातळीवर या वर्षभरात सर्वाधिक वापरला गेलेला किंवा चर्चिला गेलेला शब्द कोणता असावा? ‘पँडेमिक’ (जागतिक साथ) हा शब्द ‘वर्ड ऑफ द इअर’ म्हणून ‘मेरिअम-वेबस्टर’ या शब्दकोश कंपनीने जाहीर केला आहे. कोरोना साथीने जग व्यापले असल्याने या शब्दाची निवड होणे फारसे आश्चर्यकारक नव्हते.
न्यूयॉर्क - जागतिक पातळीवर या वर्षभरात सर्वाधिक वापरला गेलेला किंवा चर्चिला गेलेला शब्द कोणता असावा? ‘पँडेमिक’ (जागतिक साथ) हा शब्द ‘वर्ड ऑफ द इअर’ म्हणून ‘मेरिअम-वेबस्टर’ या शब्दकोश कंपनीने जाहीर केला आहे. कोरोना साथीने जग व्यापले असल्याने या शब्दाची निवड होणे फारसे आश्चर्यकारक नव्हते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सर्वसाधारणपणे एखाद्या मोठ्या घटनेबाबतच्या वृत्तामध्ये एखादा विशिष्ट तांत्रिक शब्द वापरला जातो. तो शब्द त्या घटनेचे एक अंग बनतो. ‘पँडेमिक’ हा तांत्रिक शब्द असला तरी त्याचा सर्रास वापर झाल्याने तो सर्वसामान्य झाला असल्याचे ‘वेबस्टर’चे संपादक पीटर सोकोलोस्की यांनी म्हटले आहे. कदाचित भविष्यात सध्याच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी ‘पँडेमिक’ याच शब्दाचा वापर होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
आली रे आली कोरोनाची लस आली! मॉडर्ना कंपनीची मोठी घोषणा
कोरोना संसर्ग जागतिक पातळीवर पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मार्च महिन्यात जाहीर केले आणि हा शब्द जगभरातील इंग्रजी वृत्तांमध्ये, चर्चांमध्ये, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला. इंटरनेटवरही या नावाचा वापर करून सर्च करण्याचे प्रमाण अचानक वाढले. हे प्रमाण १,१५,८०६ टक्क्यांनी अधिक, इतक्या अतिप्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा सोकोलोस्की यांनी केला आहे.
ज्यो बायडेन यांच्या कुत्र्यानेही रचला इतिहास; जाणून घ्या कोणत्या विक्रमाची रंगतीये चर्चा
‘पॅंडेमिक’चे मूळ
लॅटिन आणि ग्रीक भाषेत ‘पँडेमिक’ या शब्दाचे मूळ आहे. यातील ‘पॅन’ म्हणजे सर्व आणि डेमॉस म्हणजे सर्व लोकसंख्येसाठी. या शब्दाच्या वापराला साधारणपणे सोळाव्या शतकात सुरुवात झाली. विशेषत: वैद्यकीय अहवालात साथीच्या रोगांच्या संदर्भात तो वापरला गेला.
Edited By - Prashant Patil