"तुझ्या देशात परत जा': शिख नागरिकावर गोळीबार

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

या हल्लेखोराने मुखवटा घातल्याने त्याचा चेहरा दिसू शकला नाही. केंटमधील पोलिस दलाने या घटनेची त्वरित चौकशी सुरु केली आहे

केंट - अमेरिकेमधील सिएटल येथे एका अज्ञात श्‍वेतवर्णीयाने 39 वर्षीय शिख नागरिकावर गोळीबार केल्याची घटना घडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. गोळीबार करताना हल्लेखोर "तुझ्या देशात परत जा,' असे म्हटल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

संबंधित शिख नागरिक गेल्या शुक्रवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास काम करताना हल्लेखोर तेथे आला. या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हल्लेखोराने बंदूक काढत या शिख नागरिकाच्या खांद्यावर गोळी झाडली. "तुझ्या देशात परत जा,' असे हल्लेखोर म्हटल्याचेही पीडित नागरिकाने स्पष्ट केले. या हल्लेखोराने मुखवटा घातल्याने त्याचा चेहरा दिसू शकला नाही. केंटमधील पोलिस दलाने या घटनेची त्वरित चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात शिख नागरिकास आता घरी सोडण्यात आले आहे.

Web Title: 'Go back to your own country': Masked gunman shoots Sikh man in US

टॅग्स