esakal | बापरे ! सोन्याचा दर लाखाच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

gold

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत होत असलेल्या चढउताराचा परिणाम भारतीय बाजारासह पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. भारतात सोन्याचा दर 43,500 रुपये प्रती तोळा आहे.

बापरे ! सोन्याचा दर लाखाच्या घरात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : चीनमध्ये जोरदार प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून, पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर लाखाच्या घरात गेले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत होत असलेल्या चढउताराचा परिणाम भारतीय बाजारासह पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. भारतात सोन्याचा दर 43,500 रुपये प्रती तोळा आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानात सोन्याचे भाव ऐकून नागरिकांना धक्काच बसत आहे. पाकिस्तानात प्रतितोळा सोन्याचे भाव लाखाच्या घरात पोहोचला आहे.

पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात एका तोळ्याचे सोन्याचे भाव तब्बल 95 हजार 150 रुपये इतका आहे. 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा हा आजचा भाव आहे. भारतात एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम, मात्र पाकिस्तानात एक तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानातील हे दर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असले तरी लाखाच्या घरात दर गेल्याने नागरिकांकडून तुर्तास तरी सोने खरेदीस नकार देण्यात येत आहे.