esakal | 22 कॅरेट सोनं लावलेला वडापाव, किंमत दोन हजार रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

22 कॅरेट सोनं लावलेला वडापाव, किंमत दोन हजार रुपये

22 कॅरेट सोनं लावलेला वडापाव, किंमत दोन हजार रुपये

sakal_logo
By
नामदेव कुंभार

लोक कधी काय करतील अन् कोणत्या गोष्टी व्हायरल होतील, याचा काही नेम नाय. होय, सध्या सोशल मीडियावर 22 कॅरेट सोन्याचा वडापाव व्हायरल होतोय. तुमचा विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला असून याचीच चर्चा सुरु झाली आहे. या वडापाववर सोन्याचा मुलामा लावल्याचं दिसत आहे. हा वडापाव ऐतिहासिक काळात खजिना ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहानशा पेटीत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट्स दिल्यात.

ट्विटर मसरत दौड यांनी सोन्याच्या वडापावचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लहान जुन्या पेटीत व्हिडिओ दिसत आहे. यामध्ये सोन्याचा वडापाव दिसत आहे. व्हिडीओच्या वर 'कॅप्शनमध्ये 22 कॅरेट गोल्ड' असं लिहण्यात आलं आहे. या व्हिडिओत सोन्याचा वडापाव तयार करण्याची पूर्ण प्रक्रियाही दाखवण्यात आली आहे. पारंपरिक वड्यामध्ये बटर आणि चीजचा वापर करण्यात आला असून वडा बेसन लावून तेलात तळून घेतला आहे. त्यानंतर त्या वडापाववर 22 कॅरेटची सोन्याचे पातळ कागदाचे आवरण लावण्यात आलं आहे. या पेटीत वडापावसोबत फ्रेंच फ्राईजही दिसत आहेत.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

22 कॅरेट सोन्याचा वडापाव खाण्यासाठी दुबईला जावं लागेल. होय. हा वडापाव दुबईमध्ये मिळतो. या वडापावची किंमत चक्क दोन हजार रुपये इतकी आहे.

loading image
go to top