esakal | VIDEO: ट्राफीक पोलिसाच्या घरी 'गोल्डन टॉयलेट'; लाचखोरीतून जमवली भरपूर माया
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: ट्राफीक पोलिसाच्या घरी 'गोल्डन टॉयलेट'; लाचखोरीतून जमवली भरपूर माया

VIDEO: ट्राफीक पोलिसाच्या घरी 'गोल्डन टॉयलेट'; लाचखोरीतून जमवली भरपूर माया

sakal_logo
By
विनायक होगाडे

मॉस्को: भ्रष्टाचार ही बाब सगळीकडे दिसून येते. त्याला कुठल्याही देशाचं बंधन नाहीये. सरकारी पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा गरीब, विकसनशील आणि विकसित देशात देखील तितकाच चिंतेचा विषय आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन तोंडात बोटं घालायला लावेल, इतकी माया जमा करणारे नमुने सगळीकडे आढळून येतात. याच प्रकारचं एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. लाचखोरीच्या प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून रशियन पोलिसांनी अलीकडेच वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर छापेमारी केली आहे. त्यांनी केलेल्या या छापेमारीमधून अशी एक बाब समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल. या अधिकाऱ्याच्या घरी चक्क सोन्याचे शौचालय सापडलंय. हो! हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल, मात्र, हे खरंय. सोन्याच्या शौचालयासोबतच इतरही अनेक विलक्षण अशा चैनीच्या बाबी आढळून आल्या.

हेही वाचा: कोरोनाच्या चौकशीला चीनचा नकार; WHO चा प्रस्ताव धुडकावला

पहा व्हिडीओ:

दक्षिणी स्टॅव्ह्रोपॉल भागातील ट्राफिक पोलिस प्रमुख कर्नल अलेक्सी सफोनोव्ह यांनी अनेक व्यवसायांना बनावट परवानग्या दिल्या आणि त्या बदल्यात गडगंज अशी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्यांच्या 35 अधिकाऱ्यांसह सापळा रचून ही छापेमारी केली. छापे टाकल्यानंतर या ट्राफीक पोलिसाला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलंय. दरम्यान, त्याच्या या विलासी घराचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते शेअर केले जात आहेत.

हेही वाचा: 'कृषी कायदे रद्द करा'; संसद आवारात राहुल गांधींची निदर्शने, विरोधकांचा गदारोळ

या व्हिडीओ फुटेजमध्ये सफोनोवची भव्य हवेली, मोठामोठाल्या खोल्या, चमकदार अशी सजावट, हॉल आणि सोन्याचे सिंक असलेले सोन्याचे शौचालय दिसत आहे. हा एकटा नाहीये तर या ट्राफीक पोलिसाची स्वतंत्र टोळीच आहे. सफोनोव्हच्या या टोळीने कित्येक वर्षे या पद्धतीने लाच घेऊन ही सगळी माया जमवल्याचा आरोप आहे. सध्या तो अटकेत असून दोषी आढळल्यास सफोनोव्हला 8 ते 15 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

loading image