esakal | कोरोना संकटात गुगल-मायक्रोसॉफ्ट भारताला करणार मदत

बोलून बातमी शोधा

Google-Microsoft

गुगल कंपनी आणि कर्मचारी, युनिसेफ (UNICEF) आणि गिव इंडियाला १३५ कोटी रुपयांची मदत करणार आहे.

कोरोना संकटात गुगल-मायक्रोसॉफ्ट भारताला करणार मदत
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Pandemic : नवी दिल्ली : भारतासह अनेक देशांवर ओढावलेल्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. काही देशांमध्ये कोरोनाचे पडसाद जास्त उमटले नसले तरी भारतातील परिस्थिती भयावह होत चालली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी भारताला मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सुंदर पिचाई यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संकटामुळे मला अतिशय दु:ख झालं आहे. वैद्यकीय साहित्य पुरवठा, उच्च जोखीम असलेल्या समुदायांना मदत आणि घातक व्हायरसबाबतची महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी गुगल कंपनी आणि कर्मचारी, युनिसेफ (UNICEF) आणि गिव इंडियाला १३५ कोटी रुपयांची मदत करणार आहे.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे का? कत्तलखान्यात पाठवण्यासाठी ५० कुत्र्यांना केलं पिंजऱ्यात बंद

दुसरीकडे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात भारतातील संकटामुळे मी दुखावलो गेलो आहे. या काळात मायक्रोसॉफ्ट आपल्या संसाधने आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मदतकार्यात करेल. तसेच ऑक्सिजन उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या घटकांच्या खरेदीसाठीही मायक्रोसॉफ्ट मदत करत राहील. संकटकाळात अमेरिका सरकारने भारताला मदतीचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी आभारी आहे, असंही नडेला यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: आता दिल्लीकरांना लस मिळणार मोफत, केजरीवालांची घोषणा

दरम्यान, कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. आणि भारताला मदत करण्याचे आश्‍वासन दिलं. कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पादनासाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल भारताला तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे सुलिवन यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारताला मदत करण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यामुळे सुलिवन यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताला मदत करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. सुलिवन यांनी डोवाल यांच्याशी चर्चा करत भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली आहे.