esakal | Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल
sakal

बोलून बातमी शोधा

Google Doodle series will thank coronavirus helpers over the next two weeks

कोरोनाच्या विषाणूंनी जगाला विळखा घातलेला असताना डॉक्टर आणि नर्सेस मात्र अशा परिस्थितीत धीराने रुग्णांची सेवा करत आहेत. अशात गुगलने त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना थँक्यू म्हणत एक खास डूडल बनवले आहे.

Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूंनी जगाला विळखा घातलेला असताना डॉक्टर आणि नर्सेस मात्र अशा परिस्थितीत धीराने रुग्णांची सेवा करत आहेत. अशात गुगलने त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना थँक्यू म्हणत एक खास डूडल बनवले आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुगलच्या या खास डूडलवर कर्सर नेल्यावर To all doctors, nurses and medical workers; thank you हा मेसेज झळकतो. या डूडलमध्ये वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा इमोजीही दिसत आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोजी वापरण्यात आला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीसारख्या घटनांच्यावेळी डॉक्टर आणि नर्सेसला मानसिक आधाराची गरज असते. तोच आधार देण्यासाठी आणि ते करत असलेल्या सेवेसाठी गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे.

तलवारीने कापलेला त्या पोलिस अधिकाऱ्याचा हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला

जगभरामधील वेगवेगळ्या भागातील लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक लोकं एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या संकटाच्या प्रसंगी फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्या सर्वांच्या कामाची नोंद घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही डूडलच्या काही सीरीज लॉन्च करत असल्याचेही गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या डूडल सिरीजच्या माध्यमातून गुगल कोरोनाव्हायरस हेल्पर्सला सलाम करणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वैज्ञानिक, शिक्षक, समाजसेवक आणि आत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दखल घेतली जाणार असल्याचे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्राला हवे लॉकडाऊन; पंधरा दिवसांची वाढ शक्य

दरम्यान, जगभरातील अनेक देशामध्ये आलेल्या या संकटावर मात मिळवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. असं असतानाही काही ठिकाणी डॉक्टर आणि नर्सेसलाच वाईट वागणूक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुमच्यामुळे करोनाचा प्रसार होतोय असं म्हणणं किंवा सोसायटीमधील लोकांनी त्रास देणं अशा काही घटना भारतामध्येही समोर आल्या आहेत.

loading image
go to top