किती छान! गुगलच्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून ३ दिवस सुट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

गुगलने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर याआधीच आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ पर्यंत घरुन काम करण्याचे सवलत दिली आहे.

नवी दिल्ली- सर्वसाधारणपणे अनेकांना एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी असते. परदेशातील अनेक देशांनी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतातही अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची साप्ताहिक सुट्टी देतात. पण, अशीही एक कंपनीही आहे जिने आता आपल्या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ चांगले राहावे यासाठी गुगले आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी देणार आहे. 

गुगलने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर याआधीच आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ पर्यंत घरुन काम करण्याचे सवलत दिली आहे. आता गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ चांगले रहावे यासाठी गुगले सात दिवसांपैकी ३ दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची जाहीर केले आहे. 

जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार रहावं; WHO प्रमुखांचा इशारा

कोरोना काळात अनेकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. अनेकांना कोरोनाच्या चिंतेने ग्रासले आहे. या काळात कर्मचाऱ्यांना आपलं मन शांत ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाची  चिंता त्यांच्या कामावर वरचढ करु नये यासाठी गुगले आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टी देऊ केली आहे. कर्मचाऱ्यांनी आनंदी राहावं आणि आपलं काम चांगल्यारितीने पार पाडावं यासाठी कंपनीने ही युक्ती केली आहे.

दरम्यान, गुगलच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. गेल्या जवळजवळ ७ महिन्यांपासून लोक घरुन काम करत आहे. या काळात त्यांच्यावर कामाचा ओव्हरलोड झाला आहे. त्यामुळे गुगलने चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गुगलच्या या घोषणेनंतर अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीनेही तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी द्यावी असं वाटू लागलं आहे. शिवाय ज्यांना एका दिवसाची साप्ताहिक सुट्टी आहे, त्यांना आता किमान दोन दिवसांची तरी सुट्टी असावी असं वाटू लागलं आहे. अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटू लागली आहे.
(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google introduces three day weekend for employee