esakal | गुगलकडून अफगाण सरकारचे ई-मेल ‘लॉक’
sakal

बोलून बातमी शोधा

global

गुगलकडून अफगाण सरकारचे ई-मेल ‘लॉक’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल/ न्यूयॉर्क : तालिबानकडून अफगाणिस्तान जुन्या सरकारचे पाळेमुळे खणून काढण्याचे काम केले जात असताना सरकारची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी देखील ईमेल हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गुगलने कार्यवाही करत अफगाणिस्तान सरकारचे सर्व ईमेल खाते ब्लॉक केले. या माहितीच्या आधारे तालिबानचे दहशतवादी सरकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती.

१५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. त्यानंतर तालिबानकडून अश्रफ घनी सरकारची माहिती गोळा केली जात असून यासाठी वेगवेगळ्या स्रोतांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले होते. घनी सरकारच्या राजवटीत अन्य देशांशी झालेली माहितीची देवाणघेवाण तालिबानच्या हाती लागू शकते आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तानातील काही अधिकाऱ्यांची गोपनीय माहिती देखील तालिबानला मिळू शकते.

हेही वाचा: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पुण्यातून एकाला अटक!

परिणामी सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबतची कुणकूण काही देशांना देखील लागली होती. त्यामुळे हा डेटा चोरीस जाण्यापूर्वीच गुगलने अफगाण सरकारचे सर्व इमेल अकाउंट ब्लॉक केले. या कार्यवाहीमुळे आता कोणत्याही देशाचा डेटा चोरीस जाणार नाही आणि संवेदनशील माहिती तालिबानच्या हाती लागणार नाही.

किती डेटा गोठविला

गेल्या दोन दशकांपासून अफगाण सरकार आणि अन्य देश यांच्यात ऑनलाइन माहिती आदानप्रदान केला जात होती. यात सरकारी माहितीचा देखील समावेश आहे. अफगाणिस्तान जिंकल्यानंतर तालिबानकडून स्थानिक सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. ईमेलबरोबरच आर्थिक, उद्योग, उच्च शिक्षण, खाण मंत्रालयावरही तालिबानचे लक्ष आहे. अफगाणिस्तानातील विविध समुदायाचा डेटा देखील पूर्वाश्रमीच्या सरकारकडे आहे. त्यामुळे गुगलच्या कार्यवाहीचे स्वागत होत आहे. सायबर सुरक्षेचे तज्ञ चाड ॲडरसन यांनी हा एकप्रकारचा डिजिटल खजिना असून गुगलचे पाऊल योग्य असल्याचे म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्प्सची ईमेल सेवा देखील अफगाणिस्तानने घेतली होती. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट देखील गुगलप्रमाणेच डेटा आणि खाते बंद करेल की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गुगलच्या कार्यवाहीने संवेदनशील माहिती वाचल्याचे म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

अफगाणिस्तान सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती तालिबानकडून गोळा केली जात आहे. यात त्यांचे वेतन आणि अन्य माहितीचा समावेश होता. तालिबानच्या हाती ही माहिती लागली असती तर माजी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असता. परंतु आता गुगलने सरकारचे सर्व खाते गोठवले आहेत. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट इंकने देखील या कार्यवाहीला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वीच्या सरकारचे सर्व ईमेल खाते बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top