
गुगलची मोठी चूक अर्जेंटिनातील एका पोलिस अधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली. अधिकारी त्याच्या घराच्या अंगणात नग्नावस्थेत असताना गुगल स्ट्रीट व्ह्यू कारने त्याचा फोटो काढला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फोटोत त्याचे संपूर्ण शरीरच दिसत नव्हते, तर घराचा पत्ता आणि रस्त्याचे नाव देखील स्पष्ट दिसत होते. यामुळे, हा अधिकारी शेजारच्या लोकांमध्ये, कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी हास्याचा विषय बनला. अखेर त्याने न्यायालयात धाव घेतली आणि खटला जिंकला.