मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी लावल्या मेणबत्या अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 6 August 2020

मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी अनेकजण फंडे वापरताना दिसतात. एका प्रियकराने तर मैत्रीणीला प्रपोज करण्यासाठी फ्लॅटमध्ये 100 मेणबत्त्या लावल्या. पण, मेणबत्त्यांमुळे घराला आग लागली आणि घरातील साहित्य जळून खाक झाले.

लंडन: मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी अनेकजण फंडे वापरताना दिसतात. एका प्रियकराने तर मैत्रीणीला प्रपोज करण्यासाठी फ्लॅटमध्ये 100 मेणबत्त्या लावल्या. पण, मेणबत्त्यांमुळे घराला आग लागली आणि घरातील साहित्य जळून खाक झाले. पण, यानंतर मैत्रिणीने होकार दिल्यानंतर त्याला आनंद गगणात मावेनासा झाला.

Video: चोराने पिस्तुल दाखवताच महिलेने मॉबने धू-धू धुतले...

लंडनमधील साऊथ यॉर्कशायर परिसरात ही घटना घडली. साउथ यॉर्कशायर फायर आणि रेस्क्यू सर्व्हिसने ट्विटरवरून या घटनेची माहिती दिली. त्यांनी छायाचित्रे शेअर करताना लिहिले की, 'लक्ष देऊन बघा, घराची काय अवस्था झाली आहे. घराची अक्षरश: राख झाली आहे. पण, या घटनेमुळे इतरांना शाहणपणा येईल. शिवाय, मेणबत्तीचा वापर कसा करावा आणि करु नये, हे पण समजेल.'

दरम्यान, शेफिल्ड शहरातील एका प्रियकराने मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी रोमँटिक वातावरण निर्माण केले आहे. यासाठी त्याने फ्लॅटमध्ये १०० टीलाइट कँडलने रोषणाई केली होती. पण, या मेणबत्त्यांनी घराला आग लागली आणि घराची अक्षरश: राख झाली. या घटनेनंतरही त्याने मैत्रिणीला प्रपोज केले. मैत्रिणने होकार देताच त्याला आनंद गगनात मावेनासा झाला. घर जळाले पण मैत्रिण मिळाली.'

Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend accidentally burns down his flat while proposing to girlfriend