अमेरिकेत ग्रीन लेडी ठरतेय आकर्षण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

हिरव्या रंगाच्या छंदाबाबत त्यांना विचारले असाता, हिरवा हा अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक रंग असल्याने मला आवडतो असे त्यांनी सांगितले. 

ब्रूकलिन (अमेरिका) - येथील 74 वर्षीय एलिजाबेथ स्विटहार्ट या आपल्या एव्हरग्रीन लूक मुळे साऱ्यांचेच आकर्षण ठरत आहेत. गेले 20 वर्ष त्यांनी आपला हा ग्रीन लूक सांभाळला आहे. त्यांचे कपडे, केस एवढेच काय पण घरातल्या वस्तू देखील हिरव्या रंगाच्या आहेत.

घरातही अगदी कॉफीच्या मग पासून इंटेरीअरदेखील त्यांनी हिरव्या रंगाचे करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह केला आहे. सध्या एलिजाबेथ आपल्या घरुनच काम करत असल्या तरी, मॅनहॅटन येथील आपल्या कार्यालयातील सहकारी नेहमी माझे कौतुक करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेकजण त्यांना आपल्यालाही हिरवा रंग आवडत असल्याचे सांगतात, याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.
हिरव्या रंगाच्या छंदाबाबत त्यांना विचारले असाता, हिरवा हा अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक रंग असल्याने मला आवडतो असे त्यांनी सांगितले.

सौजन्य - New York Post youtube

Web Title: The Green Lady of Brooklyn

व्हिडीओ गॅलरी