SIPRI Report : जगाला अण्वस्त्र युद्धाचा वाढता धोका

‘सिप्री’चा अहवाल; शीतयुद्धानंतर प्रथमच शस्त्र संख्येत वाढ
growing threat of nuclear war to the world Stockholm International Peace Research Institute report
growing threat of nuclear war to the world Stockholm International Peace Research Institute reportsakal

स्टॉकहोम : आगामी काळात जगात आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर वाढण्याचा धोका असल्याचा इशारा ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सिप्री) या आण्विक शस्त्रास्‍त्रांवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिला आहे. शीतयुद्धानंतर प्रथमच अण्वस्त्रांची संख्या वाढणार आहे. जगातील नऊ अण्वस्त्रधारी देश त्यांच्या शस्त्रसाठ्यात वाढ करीत आहेत किंवा सुधारणा करीत आहेत, असे संस्थेने सोमवारी म्हटले आहे.

जगात आण्विक शस्त्रांची संख्या १२ हजार ७०५ एवढी झाली आहे. चीन व पाकिस्तान त्यांच्या अण्वस्त्रांमध्ये वेगाने भर घालीत असल्याने भारतासाठी ते चिंतेची बाब आहे, असे ‘सिप्री’च्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. शीतयुद्धानंतर जागतिक अण्वस्त्रांमध्ये घट झाली होती. पण सध्याच्या वाढत्या अण्वस्त्रांमुळे आता उतरता क्रम थांबला असल्याचे दिसून येते, असे मत ‘सिप्री’च्या सामूहिक विशानकारी शस्त्रास्त्रे कार्यक्रमातील संशोधक आणि ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट’मधील अण्वस्त्र माहिती प्रकल्पाचे संचालक हॅन्स एम. क्रिस्टेनसेन यांनी व्यक्त केले.

‘सिप्री’ने म्हटले आहे, की रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि युक्रेनला पाश्‍चिमात्य देशांनी केलेली मदत यामुळे जगातील नऊ अण्वस्त्रधारी देशांमध्ये तणाव वाढला आहे.

अण्वस्त्रधारी देश त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांमध्ये वाढवत आहेत किंवा सुधारणा करीत आहेत. ही चिंताजनक गोष्ट आहे.

-विल्फ्रेड वॅन, सामूहिक विनाशकारी शस्त्रास्त्रे कार्यक्रम, सिप्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com