esakal | Gudhipadwa 2021 : 'बेल्जियम'मध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन! परदेशात उभारल्या अभिमानाच्या गुढ्या

बोलून बातमी शोधा

belgium gudhi padwa.jpg

नोकरी व्यवसायनिमित्त बेल्जियममध्ये अनेक नागरिक स्थायिक झाले आहेत. आपली विविधतेनं नटलेली संस्कृती कुठेही असले तरी विसरता येत नाही. प्रत्येकजण जगाच्या पाठीवर संस्कृतीचं जतन करत असतो. बेल्जियम मधील मराठी कुटुंबांनीही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन परदेशात घडवलं. 

Gudhipadwa 2021 : 'बेल्जियम'मध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन! परदेशात उभारल्या अभिमानाच्या गुढ्या

sakal_logo
By
Team eSakal

गुढीपाडवा… हिंदुवर्षांनुसार महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवीन वर्ष उत्साहात साजरं केलं जातं. साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्यामुळे या सणाला खुप महत्व आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील काही राज्यांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. विविधतेनं नटलेल्या आपल्या संस्कृतीचं दर्शन देशातचं नाही तर परदेशातही पाहायला मिळाला.

बेल्जियममध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन

गुढीपाडवा सण आनंदाचा, नववर्षाचा… विजय आणि समृद्धीचे प्रतिक असणाऱ्या गुढीची गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला उभारणी केली जाते. संस्कृतीनुसार बांबूच्या काडीला नवीन वस्त्र गुंडाळून कडूलिंबाची डहाळी, साखरेची गाठी, फुलांचा हार आणि धातूचा गडू लावून गुढी उभारली जाते. देवासारखीच गुढीची पुजा करून नैवेद्य दाखवला जातो. नोकरी व्यवसायनिमित्त बेल्जियममध्ये अनेक नागरिक स्थायीक झाले आहे. आपली विविधतेनं नटलेली संस्कृती कुठेही असले तरी विसरता येत नाही. प्रत्येकजन जगाच्या पाठीवर संस्कृतीचं जतन करत असतो. बेल्जियममधील मराठी कुटुंबांनीही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन परदेशात घडवले. 

हेही वाचा - Motivational : 'खाकी वर्दीतील नझीम शेख' रहिवाशांसाठी ठरताहेत ऑक्सिजन

परदेशात उभारल्या अभिमानाच्या गुढ्या

दरवर्षीप्रमाणे यंदाही युरोपमधील बेल्जियम या देशात मराठी गुढ्या अभिमानाने उभारण्यात आल्या. भारतीय दुतावास आणि बेल्जियम मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पाडवा उपक्रमांतर्गत विविध संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बेल्जियमचे भारतीय दुत संतोष झा आणि अभिनेत्री अदिती सारंगधर उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती. बेल्जियमचे भारतीय दुत संतोष झा यांनी सर्व नागरीकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच करोना संकटात डिजिटल पाडवा उपक्रमाचे कौतुक करून काळजी घेण्याचे आवाहन केलं. 

हेही वाचा > ऑनलाइन शिक्षण पद्धतीने मुलांच्या वागणुकीत बदल; पालक, शिक्षकांसमोर आव्हान  

देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवलं...!

यावेळी नृत्यांगना आशू देवगुणे आणि शमिका सुताने यांनी नृत्य सादरीकरण केलं. प्रज्ञा चौलकर यांनी उंच माझा झोका मालिकेच्या टायटल गीत गायलं. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धे ३ ते ६ आणि ६ ते १२ वयोगटातील २९ बालचम्मुनी सहभाग नोंदवला. यामध्ये भारतीय वेशभूषा परिधान करून देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवलं. अनेकांनी आपल्या सादरीकरणातुन करोना महामारीची जनजागृती केली. कोणी शिवरायांचे मावळे झाले, कोणी श्रीकृष्ण साकारले तर कोणी सचिन तेंडूलकर होऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भारतातून परिक्षक म्हणून अभिनेत्री अदिती सारंगधर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी टिपनीस यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेल्जियम मराठी मंडळाच्या अध्यक्ष अनुश्री देशपांडे, रूपाली शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.