
ट्रम्प यांच्याकडून ‘गन लॉबी’चे समर्थन
वॉशिंग्टन - अमेरिकेत टेक्सासमधील गोळीबारानंतर देशातून ‘गन लॉबी’ संपविण्याची मागणी होत असताना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गन लॉबी’चे समर्थन केले. शस्त्रांवर नियंत्रण आणण्याची मागणी फेटाळून लावत अमेरिकेतील सभ्य नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक वापरण्याची परवानगी द्यायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ह्यूस्टन येथे आयोजित नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरए) च्या वार्षिक बैठकीत ट्रम्प शुक्रवारी (ता.२७) बोलत होते. ते म्हणाले, ‘‘गुन्हेगारांपासून स्वरक्षण करण्यासाठी अमेरिकेतील सर्व सज्जन नागरिकांना शस्त्रांची गरज आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना निःशस्त्र करण्याचे ‘एनआरए’ला काही कारण नाही. जे लोक कायद्याचे पालन व्यवस्थित करतात, त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली पाहिजे.’’
टेक्सासमधील शाळेत गोळीबारात निष्पाप बालकांचा बळी गेला, यावरून ट्रम्प यांनी अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, की बायडेन प्रशासन टेक्सासमधील शाळेतील गोळीबार आणि शाळांमधील सुरक्षेऐवजी युक्रेनमधील युद्धाला प्राधान्य देत आहे. अमेरिकेचे सरकार शाळांच्या सुरक्षेसाठी निधी गोळा करण्यावर लक्ष देत आहे. युक्रेनला पाठविण्यासाठी अमेरिकेकडे ४० अब्ज डॉलर आहेत तर आपल्या मुलांना घरी सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करण्यास आपण सक्षम असले पाहिजे.
Web Title: Gun Lobby Support From Trump
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..